पिंपरी-चिंचवड: एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असताना 2019 मध्ये नोकरी गेली. नव्या नोकरीच्या शोधात असतानाच लॉकडाऊन सुरू झाला आणि खायचेही वांदे झाले. त्यामुळे तो हातावर हात ठेवून बसला नाही. निराशही झाला नाही आणि खचलाही नाही. संकट हेच संधी मानून त्याने चहाचं दुकान टाकलं. घर-खर्चाचं तरी भागेल या हिशोबाने त्यानं चहाची टपरी टाकली. आज तो महिन्याला 50-60 हजाराची कमाई करत आहे. ही कहानी आहे पिंपरी-चिंचवडच्या रेवन शिंदेची. ( Pune Security Guard Turns Entrepreneur After Losing Job)
पिंपरी-चिंचवडचे रेवन शिंदे सुरक्षा रक्षक म्हणून एका कंपनीत काम करत होते. नोकरी गेल्यानंतर अनेक नोकऱ्या शोधल्या. पण त्यात यश आलं नाही. त्यामुळे त्यांनी कॅफे 18 नावाने एक फूड आऊटलेट उघडलं. रेवन आज दिवसाला रोज 600 ते 700 विकतात. ते आपल्या टीमसोबत 50 हजार ते 60 हजार रुपये महिन्याला कमावतात. कार्पोरेट ऑफिस आणि इंडस्ट्रियल वर्कर्सनाही ते चहा विकतात.
आधी फुकट चहा विकला
कोरोना संकटामुळे लोकांनी बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं टाळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या चहाचा धंदा होणार की नाही? असा प्रश्न रेवन यांना पडला. पण झालं उलटंच. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यावर ऑफिस सुरू झाले. पण ऑफिसाताली लोकांना चहा मिळणं कठिण झालं. त्यामुळे आम्ही आधी या कर्मचाऱ्यांना फुकटात चहा आणि कॉफी दिली. त्यांचा रिस्पॉन्स पाहण्यासाठी हा फंडा वापरला. मात्राही लागू पडली. आज आम्ही रोज 600 ते 700 कप चहा विकत आहोत, असं रेवन यांनी सांगितलं. ( Pune Security Guard Turns Entrepreneur After Losing Job)
Maharashtra: A security guard in Pune turns entrepreneur after losing job in Dec 2019
“After norms relaxed & offices reopened, people found it difficult to get tea. We decided to deliver tea & coffee for free to see the response. Now we sell 700 cups of tea daily,” he says pic.twitter.com/ObziDXk1EI
— ANI (@ANI) January 7, 2021
संबंधित बातम्या:
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखला, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन
घर घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, आधी सरकारचा निर्णय, आता SBI कडून स्वस्तात गृहकर्ज
पुण्याची धाकधूक वाढली, राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे
( Pune Security Guard Turns Entrepreneur After Losing Job)