pune sinhagad | सिंहगडाची सफर आता होणार थाटात, पुणे महानगरपालिकेने उचलले हे पाऊल

| Updated on: Sep 23, 2023 | 9:24 AM

pune sinhagad fort : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने अजरामर झालेल्या सिंहगडावर भटकंतीसाठी अनेक जण जातात. त्यांचा आनंद द्विगुणीत करणारी बातमी पुणे महानगरपालिकेने दिली आहे. यामुळे गडप्रेमींना भरपूर माहितीसुद्धा मिळणार आहे.

pune sinhagad | सिंहगडाची सफर आता होणार थाटात, पुणे महानगरपालिकेने उचलले हे पाऊल
sinhagad fort
Follow us on

पुणे | 23 सप्टेंबर 2023 : गड, किल्ल्यांमध्ये साहसी मोहिमांची आखणी करुन फत्ते करण्याचा आनंद अनेक जण घेत असतात. पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांना भेट देऊन शिवाजी महाराजांच्या कार्यपासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे पुण्यातील शिवनेरीपासून सिंहगड किल्ल्यापर्यंत सर्वच ठिकाणी नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. पुणे शहरापासून सर्वात जवळ सिंहगड किल्ला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी पुणे मनपाने एक पाऊल उचलले आहे.

काय आहे मनपाची योजना

पुणे महापालिकेचा शनिवार वाडा ते विश्रामबागवाडा असा हेरिटेज वॉक सुरु केला होता. त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर आता सिंहगड किल्ला आणि आंबेगावमधील शिवसृष्टीसाठी सिग्नेचर वॉक सुरु करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यासाठी वातानूकुलित बसेस सोडण्यात येणार आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरुन या वातानूकुलित मिनी बस सोडल्या जाणार आहे.

सोबत गाईडसुद्धा देणार

पुणे शहराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. या ऐतिहासिक महत्वाची ओळख विद्यार्थी आणि पर्यटकांना योग्य पद्धतीने व्हावी यासाठी पुणे महापालिकेने नुकताच हेरिटेज वॉक सुरू केले होते. दर शनिवार शनिवाडा ते विश्रामबागवाडा दरम्यान असणारी ऐतिहासिक ठिकाणे दाखवली जातात. आता सिंहगड किल्ला आणि आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी सिग्नेचर वॉक सुरु केला जात आहे. यावेळी पर्यटकांना गाईडसुद्धा देण्यात येणार आहे. यामुळे ऐतिहासिक किल्ल्याची सर्व माहिती पर्यटकांना मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

बुकींग करण्याची सुविधा

वन विभागाने सिंहगडावर जाण्यासाठी ऑनलाईन बुकींग सुरु केले आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे शनिवार, रविवारी तिकीट काढण्यासाठी होणारी गर्दी होत नाही. पुणे वनविभागाने ऑनलाइन शुल्क भरुन तिकीट दिले आहे. यामुळे सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची सुविधा होत आहे.महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसीचे रिसोर्ट सिंहगडावर आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याची आणि जेवणाची सुविधा आहे. त्याचाही फायदा पर्यटकांना घेतो येतो. यामुळे भटकंती आता अधिक आरामदायी झाली आहे.