पुण्यात राहून एकदाही पाहिली नाहीत ‘ही’ ठिकाणं, मग आजच बघा, नाहीतर होईल पश्चात्ताप

| Updated on: Nov 21, 2024 | 11:54 AM

पुण्यात राहणाऱ्या अनेकांना शहरातील प्रसिद्ध स्थळांची माहिती नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुण्यातील तीन महत्त्वाची स्थळे सांगणार आहोत. कमी बजेटमध्येही तुम्ही या स्थळांना भेट देऊ शकता.

पुण्यात राहून एकदाही पाहिली नाहीत ही ठिकाणं, मग आजच बघा, नाहीतर होईल पश्चात्ताप
Follow us on

Pune Tourism Place : पुण्यात राहूनही काही लोक शहरातील प्रसिद्ध ठिकाणांना भेटी देण्याचा प्लॅन करत नाहीत. आपलं काम भलं आणि आपलं घर भलं या चक्रातच लोक गुंतलेले असतात. आपण ज्या शहरात राहतो, तिथल्या प्रसिद्ध वास्तू बघाव्यात असं या लोकांना वाटत नाही. पुण्यासारख्या शहरात इतक्या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्या पाहिल्यावर मन प्रसन्न होतं. ऐतिहासिक आणि प्राचीन महत्त्व असलेलं हे शहर आहे. खरंतर तीन दिवसांची सुट्टी घेऊन सहकुटुंब ही स्थळं पाहायला गेली पाहिजेत, इतकी ती अप्रतिम आहेत.

पुण्यातील तीन ठिकाणे तर अशी आहेत की त्यांना भेट दिलीच पाहिजे. ही स्थळे अतिशय देखणी आहेत. यामुळे लोक स्थळांकडे आकर्षित होतात. या स्थळांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या स्थळांना आवर्जुन भेटी दिल्या पाहिजेत. खरंतर कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत जावीत अशीच ही स्थळे आहेत. कोणती आहेत ही स्थळे? त्यावर टाकलेला हा प्रकाश.

पर्वती हिल

पर्वती ही डोंगर समुद्र सपाटीपासून 2100 फूट उंच आहे. त्यामुळे तुम्हाला शहरात राहूनही डोंगरांवर फिरण्याची संधी मिळेल. या डोंगरावरून पुण्याच्या अद्भुत सौंदर्याचे दर्शन घडते. या डोंगरावर एक पार्वती मंदिर आहे, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासह दर्शन घेऊ शकता. हिवाळ्यात या डोंगरावर धुक्यांची चादर पसरलेली असते. धुक्यांची ही अथांग चादर पाहून मन मोहून जातं. पुण्यात कुटुंबासोबत फिरण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे.

लेण्याद्रीची गुफा

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ही गुफा आहे. लेण्याद्री गुफा भगवान गणेशाला समर्पित आहे. लेण्याद्रीची गुफा गणेश पर्वताची गुफा म्हणूनही ओळखली जाते. लेण्याद्रीचे अष्टविनायकांमध्ये सहावे स्थान आहे. या गुफेची वास्तुकला इतकी सुंदर आहे की तुम्ही तासन् तास बसून ही वास्तूकला पाहू शकता. या ठिकाणी भक्तांची रोज गर्दी असते. ही जागा पुणे जिल्ह्याच्या जुन्नारपासून सुमारे 4.8 किलोमीटर उत्तरेस आहे. पुण्याच्या सर्वात सुंदर डोंगरांमध्ये लेण्याद्री गुफा आहे.

सारस बाग

लहान मुलांसाठी ही एक उत्कृष्ट जागा आहे. येथे रंग-बिरंगे फूलं पाहायला मिळतात. सारसबागमध्ये एक सुंदर तलाव देखील आहे. थंडीच्या हंगामाची सुरूवात होताच, ही जागा आणखी आकर्षक दिसायला लागते. कुटुंबासाठी हे अत्युत्तम पिकनिक ठिकाण मानले जाते. येथे भगवान गणेशाचं एक मंदीर देखील आहे. तुम्ही येथे तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत वीकेंडवर फिरण्याची योजना बनवू शकता. कमी बजेटमध्ये सुंदर जागा शोधणार्‍या लोकांसाठी ही जागा नक्कीच चांगली आहे.