पुणेकरांनो बाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीतील हा बदल पाहून घ्या…

| Updated on: Jan 14, 2025 | 8:17 PM

pune traffic diversion: गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरू आहे. वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे.

पुणेकरांनो बाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीतील हा बदल पाहून घ्या...
pune traffic diversion
Follow us on

pune traffic diversion: पुणे शहरातील पायाभूत सुविधा वाढवण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. पुण्यात आता रिंग रोडचे काम सुरु होत आहे. मेट्रो प्रकल्प सुरु झाला आहे. पुण्यातील मेट्रो हिंजेवाडीपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. यामुळे पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त अमोल झेंडे यांनी काढले आहे.

गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरू आहे. वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे.

असा असणार बदल

बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक : बाणेरकडून येणारी वाहतूक औध रोडवर वळवून राजभवन समोरील पंक्चरमधून युटर्न घेवून पुन्हा विद्यापीठ मार्गे शिवाजीनगर इच्छितस्थळी जातील.

हे सुद्धा वाचा

शिवाजीनगरकडून औंध कडे जाणारी वाहतुक: शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक ही पुणे विद्यापीठ चौकातून सरळ औंधरोड मार्गे इच्छितस्थळी जातील.

औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक: औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक ही मिलेनियम गेट चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या गेटमधून पुणे विद्यापीठ परिसर-उजवीकडे वळून-वाय जंक्शन- विदयापीठ मुख्य प्रवेशव्दारातून बाहेरपडून इच्छितस्थळी जातील.

मेट्रोच्या अजून चार मार्गांना मंजुरीची प्रतिक्षा

पुणे मेट्रोचे सात मार्ग आहेत. त्यातील चार मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली नाही. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, खडकवासला-स्वारगेट-खर्डी, एसएनडीटी ते माणिकबाग या मार्गांना केंद्र सरकारकडून मंजुरी अजून मिळालेली नाही. पुणे मेट्रोचा स्वारगेट ते शिवाजीनगर हा मार्ग नुकताच सुरु झाला. हा संपूर्ण भुयारी मार्ग आहे. पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान सर्व स्थानके भुयारी आहेत. मेट्रोचे जिल्हा न्यायालयातील स्थानक ३३.१ मीटर खोल आहे. त्यानंतर कसाब पेठ हे स्थानक ३० मीटर खोल आहे. मंडई स्थानक २६ मीटर खोल आहे. तर स्वारगेट स्थानक २९ मीटर खोल आहे.