पुणे आणि मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. पुणे अन् मुंबईतून वंदे भारत सुरु होणार आहे. पुणे शहरातून अद्यापपर्यंत स्वतंत्र वंदे भारत ट्रेन नाही. परंतु आता पुण्यातून स्वतंत्र वंदे भारत येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. तसेच मुंबईवरुन कोल्हापूर जाणारी वंदे भारत ट्रेनही पुण्यावरुन जाणार आहे. यामुळे पुणेकरांना येत्या सोमवारपासून दोन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. मुंबईवरुन सातवी वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. भारतातील सेमी हायस्पीड असलेल्या वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. यामुळे विविध ठिकाणांवरुन ही ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे.
पुण्याच्या पहिल्या वंदे भारतचे उद्या १६ सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. उद्यापासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण होणार आहे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे शहरातून आणखी दोन ट्रेन सुरु होत असल्यामुळे पुण्याला तीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. यापूर्वी पुण्यावरुन मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन सुरु आहे. त्यानंतर 16 सप्टेंबरपासून सुरु होणारी मुंबई कोल्हापूर वंदे भारत ट्रेनही पुण्यावरुन जाणार आहे. तसेच पुणे ते हुबळ ही स्वतंत्र ट्रेनही 16 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे पुण्यातून तीन तर मुंबईतून सातवी ट्रेन मिळणार आहे.
पुणे कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची आज ट्रायल रन होणार आहे. सकाळी अकरा वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस पुण्याकडे धावणार आहे. आठ डब्यांची भारत रेल्वे विना प्रवासी धावणार आहे. त्यानंतर सोमवार 16 सप्टेंबरपासून ही ट्रेन सुरु होणार आहे. कोल्हापूर पुणे आणि पुणे हुबळी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होत आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता प्रवाशांना घेऊन वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरातून पुण्याच्या दिशेने धावणार आहे. आठवड्यातून तीन दिवस असणार पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे.
मुंबईवरुन सहा वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता मुंबई कोल्हापूर ही सातवी वंदे भारत ट्रेन धावणार आहे. सध्या मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान सर्वात वेगाने धावणारी ट्रेन महालक्ष्मी एक्सप्रेस आहे. ही ट्रेन 518 किलोमीटर आंतर 10.5 तासांत पूर्ण करते. तिचा सरासरी वेग 48.94 किलोमीटर प्रतितास आहे. महाराष्ट्रातून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची संख्या आता अकरा होणार आहे.