पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध (Pune Unlock) सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने गाईडलाईन्स जारी (Pune Unlock Guidelines) केल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील मॉल, अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर लग्न सभारंभासाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, लग्न समारंभाला 50, तर अंत्यसंस्कारांच्या कार्यक्रमांमध्ये केवळ 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे. (Pune Unlock : Permission for 50 peoples forwedding ceremony, 20 for the funeral)
पुण्याच्या शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने त्याठिकाणी सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तर पुण्यातील पीएमपी बससेवाही आजपासून 100 टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. सार्वजनिक बस वाहतूक सुरु झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी (Break the chain) सोमवार दि. १४ जून २०२१ पासून सुरू होत असलेल्या नव्या नियमावलीचे दि. ११ जून २०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश.#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार #PMCFightsCorona #PuneFightsCorona#BreakTheChain pic.twitter.com/6MIDjRBKQo
— PMC Care (@PMCPune) June 11, 2021
पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथील करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय लागू केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुपारी दिली होती. कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हा निर्णय लागू होईल. मात्र पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण क्षेत्रात मात्र यापुर्वीचेच निर्बंध कायम राहतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.
कोरोना रोखण्यासाठी विविध स्तरावर उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारणीवर भर देण्याचे निर्देशही अजित पवार यांनी यंत्रणेला दिले.
संबंधित बातम्या
पुण्यात सोमवारपासून Unlock, काय सुरु, काय बंद? वाचा नव्या गाईडलाईन्स
सोमवारपासून पुणे शहरातील निर्बंध शिथिल करणार, पण लक्षात ठेवा…; अजितदादांनी बजावले