पुणे : पुणेकरांना आणखी एक सुविधा मिळाली आहे. पुणे मुंबई विमान सुरु झाल्यानंतर दोन्ही शहरातील प्रवास फक्त तासाभरात आला आहे. 26 मार्चपासून सुरु झालेल्या या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पुण्याहून धार्मिक पर्यटनाची नगर असलेल्या काशीला जाण्यासाठी विमानसेवा सुरु झाली आहे. यामुळे काशीश्वराचे दर्शन कमी वेळेत घेणे पुणे शहरातील नागरिकांना सोपे होणार आहे. पुण्याहून इंडिगो एअरलाइन्सने ही उड्डाण सेवा सुरू केली आहे.
पूर्वांचलच्या जनतेला पुणे शहरात थेट येता येणार आहे. यामुळे वाराणसी आणि आसपासच्या भागातील लोकांना मोठी सुविधा झाली आहे. पुणे आणि वाराणसी तसेच वाराणसी टू पुणे फ्लाइट सुरु झाली आहे. ही विमानसेवा आठवड्यातील प्रत्येक दिवशी असणार आहे. इंडिगो एअरलाइन्सने ही उड्डाण सेवा सुरू केली आहे. इंडिगोचे फ्लाइट 6E 6798 हे पुण्याहून 154 प्रवाशांना घेऊन वाराणसीला गेली. त्यानंतर हेच विमान दुपारी 1.40 वाजता 105 प्रवाशांसह वाराणसीहून पुण्याकडे आले.हे इंडिगो विमान ३१ मार्च रोजी वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाले होते. त्यावेळी प्रवाशांनी आनंदी व्यक्त केला.
किती असणार भाडे
इंडिगोच्या वेबसाइटवर पुणे ते वाराणसी विमानसेवेच्या भाड्याची माहिती दिली आहे. विमानाचे नियमित भाडे 5452 रुपये, फ्लेक्सी प्लस 7195 रुपये असणार आहे. सुपर 6E 10,870 रुपये असेल. तर वाराणसी ते पुणे येथील प्रवाशांना सेवर क्लाससाठी 4922 रुपये द्यावे लागतील. फेल्सी प्लससाठी 5656 रुपये तर सुपर 6ई साठी 9462 रुपये भाडे असणार आहे.
काशीविश्वेश्वराचे दर्शन सोपे होणार
वाराणसी ही धार्मिक शहर आहे. काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य असणारे क्षेत्र आहे. दिवोदासाच्या कर्मयोगामुळे काशीमध्ये देवाने वास्तव्य केले. येथील काशी विश्वेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. या ठिकाणी काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. आता पुण्याहून सरळ विमान सुरु झाल्याने रेल्वे मार्गापेक्षा कमी वेळेत काशीला जात येणार आहे.
हे वाचा…
पुणे-मुंबई प्रवास फक्त एका तासात, पाहा वेळ अन् तिकीट दर
क्रीडांगणाचा हा Video पाहिल्यावर तुम्हाला कळेल,आयडियाची देशात कमी नाही, आनंद महिंद्राही झाले खूश