पुणे: शेवाळेवाडी ग्रामपंचायतीचा पालिकेत समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शेवाळेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि संभ्रम निर्माण झाला असून या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत निवडणुकीवरच बहिष्कार टाकला आहे. एकीकडे राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू असतानाच एखाद्या ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरची पहिलीच घटना आहे. (pune villagers boycott gram panchayat election)
राज्य सरकारेने 23 डिसेंबर रोजी अधिसूचना काढून 23 गावांना पुणे पालिकेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या 23 गावांमध्ये शेवाळेवाडीचाही समावेश आहे. शेवाळेवाडी ग्रामपंचायतीची पालिकेत समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे ग्रामपंचायतीची निवडणूकही जाहीर झाल्याने गावातील अनेक इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन बैठक घेतली आणि सर्वानुमते या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एकही ग्रामस्थ निवडणूक रिंगणात उतरणार नाही. शिवाय मतदानाच्या दिवशी कोणीही मतदानासाठी घराबाहेर पडणार नाही.
दरम्यान, शेवाळेवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया आधीपासूनच सुरू होती. या गावाची निवडणूक रद्द झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयात आली नाही. जोपर्यंत अधिसूचना येत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनी बहिष्काराचं हत्यार उपसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
औरंगाबादेत खुल्या प्रवर्गाला जागाच नाही
औरंगाबद येथील सिल्लोड तालुक्यातील आमसरी ग्रामपंचायतीतील सर्वच जागा आरक्षित असून खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा ठेवण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमसरी ग्रामपंचायतीच्या 9 पैकी 9 जागांवर आरक्षण टाकण्यात आलं आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील लोकांनी जायचं कुठं? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, येथील काही गावकऱ्यांनी थेट न्यायालयात धावा घेतली असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या 9 पैकी सहा जागा एसटी, एक जागा एससी आणि दोन जागा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. (pune villagers boycott gram panchayat election)
VIDEO: TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 PM | 25 December 2020https://t.co/AwLQs7N6jl#Top9News #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
संबंधित बातम्या:
LIVE | औरंगाबाद महापालिकेतही आता जीन्स आणि टी शर्टला बंदी, कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड जारी
ग्रामपंचायतीसाठी ऑनलाईन अर्ज बंधनकारक, गावपुढाऱ्यांची कसोटी!
(pune villagers boycott gram panchayat election)