Pune | मुंबई पाठोपाठ पुण्याच्या प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती…

| Updated on: Aug 22, 2022 | 11:43 AM

तीन ऐवजी चारचा प्रभाग करण्याचा राज्य सरकारचा निर्णय होता. ज्याला आता सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाली आहे. 

Pune | मुंबई पाठोपाठ पुण्याच्या प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती...
Follow us on

पुणे : राज्यातील महापालिकेच्या निवडणूका (Election) तोंडावर आल्या आहेत. मात्र, यादरम्यान प्रभाग रचनेत बदल करण्यात आल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 2017 च्या प्रभाग रचनेत मोठे बदल करत चार ऐवजी तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath shinde) मोठी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवला. आता राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार आहे. नव्या सरकारने 2017 प्रमाणे प्रभाग रचना ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला. मात्र, सततच्या प्रभाग (Word) रचनेतील बदलामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

पुण्यातील प्रभाग रचनेच्या बदलाविरोधात राष्ट्रवादी शहर काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आता प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळालीयं. 2017 नुसार महापालिका निवडणुका घेण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाचा निर्णयामुळे राज्यातील भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका बसलायं.

राष्ट्रवादी शहर काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती

तीन ऐवजी चारचा प्रभाग करण्याचा राज्य सरकारचा निर्णय होता. ज्याला आता सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाली आहे. याविरोधात राष्ट्रवादी शहर काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्याने राज्यात 3 सदस्यीय प्रभागाप्रमाणेच निवडणूका होण्याची दाट शक्यता आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक तोंडावर

पुणे महापालिकेत सतत प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यात येत असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला होता. कारण महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना प्रभाग बदलत होते. यामुळे प्रस्थापित नगरसेवक आणि इच्छुकांना प्रभागामध्ये काम करणे अवघड जात होते. मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतील बदलाला कोर्टाकडून स्थगिती मिळालीयं.

पुणे महापालिका भाजपाचा गड

पुणे महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे. भाजपाचा बालेकिल्ला म्हणून पुणे महापालिका ओळखली जाते. मात्र, यंदाच्या निवडणूकीमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी देखील कामाला लागलीयं. यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणूक यंदा चर्चेची ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये देखील भाजपाची सत्ता आहे. या दोन्ही पालिकेमधील सत्ता टिकवण्यासाठी भाजपा देखील कामाला लागलीयं.