Pune water cut postponed | पुणेकरांना दिलासा ; पुण्याच्या पाणी कपातीस तूर्तास स्थगिती

| Updated on: Dec 04, 2021 | 4:03 PM

पुणे शहरात पाणीकपात केल्यास सद्यस्थितीला शहराच्या सर्व भागात पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याची माहिती यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती . शहराची वाढती लोकसंख्या त्याचबरोबर नव्यानं समाविष्ट होणाऱ्या २३ गावे यासगळ्याच विचार करता शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करणे योग्य होणार नाही.

Pune water cut postponed | पुणेकरांना दिलासा ; पुण्याच्या पाणी कपातीस तूर्तास स्थगिती
Follow us on

पुणे – पुणे शहरातील पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याच्या जलसंपदा विभागाच्या निर्णयानंतर पुणेकर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. पुण्याच पाणी कमी करण्याचा हा डाव असल्याचा आरोपही महापौर मुरलीधर मोहळ यांनी केला होता. त्यानंतर जलसंपदा विभागाने तातडीने बैठक घे पुण्याचा पाणी पुरवठा कमी करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

पाणी कपातीस स्थगिती
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याशी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाणीकपातीच्य संदर्भात चर्चा केली होती. पुणे शहरात पाणीकपात केल्यास सद्यस्थितीला शहराच्या सर्व भागात पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याची माहिती यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती . शहराची वाढती लोकसंख्या त्याचबरोबर नव्यानं समाविष्ट होणाऱ्या २३ गावे यासगळ्याच विचार करता शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करणे योग्य होणार नाही. त्यामुळं पोलीस बंदोबस्तात होणारी पाणी कपात तूर्तास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणेकर पाणी पाजल्या शिवाय राहणार नाही
नुकतेच पुणे दौऱ्यावर येऊन गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्या प्रश्नावरून सरकाराला फटकारले होते. पुणेकरांच्या पाणी कपातीच्या प्रश्नावर बोलताना , “पुण्याचं पाणी कमी करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. जो पुण्याचं पाणी कमी करेल, पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही.” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

MPSC Exam Schedule 2022 : एमपीएससीकडून पुढील वर्षातील परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, कोणती परीक्षा कधी? वाचा एका क्लिक वर
Nashik| इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही…पांढरपट्टे यांच्या गझल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

Video | बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध… संजय राऊत आणि पुर्वशीचा खास व्हिडीओ पाहिलात का?