पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातला पाऊस (Rain in Maharashtra) थांबला आहे. काही निवडक विभाग वगळता राज्यात पाऊस कोसळलेला नाही. त्यामुळे तापमानात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. पुण्यात (Pune Weather) तर गेल्या आठवड्यापासून वरूणराजा बरसलेला नाही. तुरळक पाऊस सोडला तर पुण्यात पावसाने सरासरीही गाठलेली नाही. (Due to lack of rain the temperature is rising in Pune)
पुण्यात आज किमान तापमान 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आहे. हवेची गुणवत्ता ठिक असून दिवसा 41 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. आज रात्रीचं सरासरी तापमान 26 अंश सेल्सिअस असेल. रात्री वाऱ्याचा वेग कमी होऊन 32 किमी प्रतितास असेल.
मॉन्सून गायब झाल्यानंतर मागच्या तीन ते चार दिवसांपासून पुण्यातलं तापमान वाढलं आहे. किमान आणि कमाल तापमानात सरासरी दोन ते चार अंशांनी वाढ झाली आहे. दिवसा प्रखर ऊन तर रात्रीही उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीट ऑगस्टमध्येच जाणवत असल्याचं चित्र आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत ऑगस्ट महिन्यात सरासरी तापमान हे 25 ते 30 अंशांवर स्थिर असतं. पण आता मॉन्सूनची थांबल्याने तापमानात वाढ झाल्याचं दिसतंय. राज्यात सध्या सरासरी तापमान हे 31 अंशांवर गेलं आहे.
राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी हिमालयात पश्चिमी विक्षोभ सुरू झाला आहे. त्यामुळे हिमालयात जोरदारा पावसाचा अंदाज आहे. 25 ऑगस्टपासून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मात्र, 10 ऑगस्टपर्यंत राज्यात कुठेही जोरदारा पावसाचा अंदाज नाही. या कारणाने तापमान आणि उन्हाचा चटका आणखी वाढण्याची चिन्हं आहेत.
इतर बातम्या :