पुणे : गेल्या आठवड्यापासून पुण्यात पावसाने (Pune Rain) दडी मारल्याने आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा 29 मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे (Pune) शहर आणि परिसरात या आठवड्यात आकाश अंशतः ढगाळ राहील असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील अशी माहिती देण्यात आली आहे. (Pune received 29 mm less rainfall than the average so far)
शहरात 1 जूनपासून 22 ऑगस्टपर्यंत 382.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत दरवर्षी सरासरी 412.4 मिमी पाऊस पडतो. त्यामुळे यंदा शहरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचं स्पष्ट होत आहे. या आठवड्यात पुणे शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांत शहर आणि परिसरातलं किमान तापमान हे 20 ते 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
1 जून ते 22 ऑगस्टदरम्यान राज्यात सरासरी 752.9 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. सोमवार ते गुरूवारदरम्यान राज्याच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये राज्यातल्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ईशान्य राजस्थान, मध्य प्रदेश, मराठवाडा, पश्चिम बंगाल आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत अशा काही भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा काही प्रमाणात दक्षीणेकडे सरकला आहे. तो बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दुसरीकडे राजस्थानजवळच्या चक्राकार वाऱ्यांपासून तमिळनाडूपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या पावसाच्या सक्रियतेवर परिणाम झाला आहे.
इतर बातम्या :