पुणे | 31 ऑगस्ट 2023 : पुणे जिल्हा परिषदेसाठी तब्बल ८९९ जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेमधील ३४ विभागात ही पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रियेसाठी २५ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून ही प्रक्रिया राबवली जात आहेत. या पदांसाठी किती अर्ज आले, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. त्यानुसार मोठ्या संख्येने अर्ज उमेदवारांनी केले आहे. यामुळे या भरतीसाठी चांगलीच स्पर्धा रंगणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी मुदतीअखेर 74 हजार 507 उमेदवारांनी अर्ज मिळाले आहेत. हे सर्व अर्ज ऑनलाइनपद्धतीने मागवण्यात आले होते. भरती प्रक्रियेसाठी सर्वाधिक अर्ज आरोग्यसेवक (पुरुष) पदासाठी सर्वाधिक अर्ज मिळाले आहेत. 124 जागांसाठी 28 हजार 209 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर आरोग्यसेवक महिला 436 जागा आहे. मात्र त्यासाठी केवळ 3 हजार 930 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
राज्यातील भरतीसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या भरतीसाठी घेण्यात येणारे शुल्क कमी करण्याची मागणी त्यांनी केली होती. एकट्या पुणे जिल्हा परिषदेकडे भरती प्रक्रियेसाठी तब्बल 6 कोटी 66 लाख 52 हजार रुपये आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी ही माहिती दिली.
पुणे जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर सप्टेंबरअखेरपर्यंत परीक्षा होण्याची शक्यता आहे. या परीक्षेनंतर निकाल आणि मुलाखती असा क्रम असणार आहे. तलाठी भरती प्रक्रियेनंतर आता जिल्हा परिषदेच्या भरतीला वेग आला आहे.
राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आलेल्या पदांवर देखील पुण्यात पदभरती नाही. पुरवठा विभागात नव्याने भरण्यात 82 पदे येणार होते. मात्र 82 पदांपैकी फक्त 42 पदे भरण्यात आली. इतर महत्त्वाची पदे आजही रिक्त आहेत.