पुणे : पुणे जिल्हा परिषदेसाठी मोठी भरती निघाली आहे. जिल्हा परिषदेतील ३४ विभागात ८९९ पदे भरली जाणार आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. ही भरती प्रक्रिया प्रथमच इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. या भरतीसाठी अभ्यासक्रम जिल्हा परिषद तयार करणार आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक होणार असून प्रश्नपत्रिका फुटू नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता सुरु होणार असल्यामुळे अनेक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
ऑनलाइन होणार परीक्षा
पुणे जिल्हा परिषदेसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद एजन्सीला अभ्यासक्रमचा पॅटर्न देणार आहे. त्यानंतर इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून परीक्षा घेतली जाणार आहे. या संस्थेशी यासंदर्भात करार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत ३४ विभागांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यासाठी वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
अशी घेणार काळजी
भरतीसाठीची प्रश्नपत्रिका इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या एजन्सीद्वारे सेट केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना अभ्यासक्रमाचा पॅटर्न जिल्हा परिषद देणार आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार होतील. परीक्षेच्या पाच मिनिटांपूर्वी प्रश्नत्रिका संबंधित केंद्रावर पोहोचणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका लिक होणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
एमपीेएससीची भरती
MPSC मार्फत राज्य शासनाच्या पाच विभागाची भरती होणार आहे. त्यासाठी प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगातर्फे जाहीर केली आहे. तब्बल पाच विभागातील ६७३ पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीची पूर्व परीक्षा ४ जून रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. MPSC आयोगाने नोटिस काढली असून ट्विटरवर देखील माहिती दिली आहे.
कोणत्या विभागात भरती