बर्गर किंग पुण्याचा, अमेरिकन कंपनी विरुद्धच्या कायदेशीर लढाईत पुणेकराचा विजय

| Updated on: Aug 19, 2024 | 7:52 AM

Pune Burger King: अमेरिकन कंपनीने पुण्यातील बर्गर किंग रेस्टॉरंटवर आपले नाव वापरल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. भारतात बर्गर किंगच्या नावाने सुरू असलेली ही कायदेशीर लढाई 13 वर्षे चालली. आता निर्णय पुण्याच्या कंपनीच्या बाजूने आला आहे.

बर्गर किंग पुण्याचा, अमेरिकन कंपनी विरुद्धच्या कायदेशीर लढाईत पुणेकराचा विजय
Pune Burger King
Follow us on

Pune Burger King: पुणेकर आपल्या बुद्धीचातुर्य, चिकटी आणि निष्ठेमुळे ओळखले जातात. जगभरात आपल्या या गुणांच्या जोरावर पुणेकरांनी आपल्या यशाची पताका रोवली आहे. व्यवसायात पुणेकरांची प्रगती चौफेर झाली आहे. पुण्यातील एका व्यावसायिकाने दिग्गज अमेरिकन कंपनी बर्गर किंगला धडा शिकवला. जगभरात 100 देशांमध्ये 13 हजार रेस्टॉरेंट असणाऱ्या बर्गर किंगविरुद्धची कायदेशीर लढाई पुणेकराने जिंकली आहे. पुणे शहरात बर्गर किंग नावाच्या लोकप्रिय रेस्टॉरंटने बर्गल किंगविरुद्धची कायदेशीर लढाई जिंकली आहे.

अमेरिकन कंपनीने पुण्यातील बर्गर किंग रेस्टॉरंटवर आपले नाव वापरल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. भारतात बर्गर किंगच्या नावाने सुरू असलेली ही कायदेशीर लढाई 13 वर्षे चालली. आता निर्णय पुण्याच्या कंपनीच्या बाजूने आला आहे. अमेरिकन एमएनसी बर्गर किंगसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

न्यायायलयाचा निकाल असा

पुण्यातील कॅम्प परिसरात बर्गर किंग रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटविरुद्ध अमेरिकन फास्ट फूड कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनने दाखल केलेली याचिका पुणे जिल्हा न्यायालयाने फेटाळली. न्यायाधीश सुनील वेद पाठक यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, अमेरिकन कंपनीने पुणे येथील कंपनीवर ट्रेडमार्क उल्लंघनासह अनेक आरोप केले होते. पुण्यातील कंपनीला त्यांचे नाव वापरण्यास बंदी घालावी, अशी मागणी कंपनीने न्यायालयाकडे केली होती. शिवाय त्यांना नुकसानभरपाईही देण्यात यावी. पुण्याचे बर्गर किंग रेस्टॉरंट अनाहिता आणि शापूर इराणी चालवतात. कॅम्प आणि कोरेगाव भागात त्यांची रेस्टॉरंट्स आहेत. त्यांचे नाव 1992-93 पासून आहे. अमेरिकन कंपनी खूप नंतर भारतात आली. दुसरीकडे पुण्याची कंपनी हे नाव बराच काळ वापरत होती. यामुळे अमेरिकन कंपनीची मागणी फेटाळली जात आहे.

हे सुद्धा वाचा

बर्गर किंगची 13 हजार रेस्टॉरंट

बर्गर किंगची स्थापना 1954 मध्ये झाली. त्याची सुरुवात जेम्स मॅकलॅमोर आणि डेव्हिड एडगरटन यांनी केली होती. ही कंपनी 100 हून अधिक देशांमध्ये 13 हजार रेस्टॉरंट चालवत आहे. या रेस्टॉरंटपैकी 97 टक्के या कंपनीची मालकी आहे. ही जगातील दुसरी सर्वात मोठी फास्ट फूड हॅम्बर्गर कंपनी मानली जाते. यामध्ये सुमारे 30,300 लोक काम करतात. 1982 मध्ये कंपनीने प्रथमच आशियामध्ये प्रवेश केला. पण २०१४ मध्ये ही कंपनी भारतात आली. नवी दिल्ली, मुंबई आणि पुणे येथून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.