Pune Crime | सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला! आंबेगावमध्ये ऊसाने भरलेली ट्राली अंगावर कोसळल्याने जागीच मृत्यू

| Updated on: Feb 05, 2022 | 5:24 PM

मेंगडेवाडी रस्त्याच्या तीव्र उतारावर हा ट्रॅक्टरवरीला चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झालयाने भीषण अपघात झाला. ट्रॅक्टरट्रॉली दोघी बहिणींच्या अंगावर कोसळला. त्या दोघेही उसाखाली दाबल्या गेल्या. त्याच एका बहीणाचा जागी तर दुसऱ्या बहिणीचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.

Pune Crime | सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला! आंबेगावमध्ये ऊसाने भरलेली ट्राली अंगावर कोसळल्याने जागीच मृत्यू
Follow us on

सुनिल थिगळे, पुणे – आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडल्याने दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी(Sister Death ) मृत्यू झाला आहे. ऊसाने( sugarcane) भरलेल्या ट्रॅक्टरमध्ये त्या बसलया त्यानंतर तीव्र उतारावर ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर कोसळून जिजाबाई दुधवडे आणि भिमाबाई गांडाळ या दोन सख्ख्या बहिणींचा यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंचर-पारगाव (Manchar- Pargaon)  रस्त्यावर मेंगडेवाडी हद्दीत हा अपघात झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अशी घटना घडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव येथील निरगुडसर येथील महादू संभू वळसे यांच्या शेतातील ऊस तोडणी झाल्यानंतर ऊस ट्रॅक्टरमध्ये भरण्यात आला. ऊस विक्रीसाठी घेऊन जात असताना भरलेल्या ऊस ट्रॅक्टरमध्ये भरून जिजाबाई पंढरीनाथ दुधवडे आणि भिमाबाई यादव गांडाळ या दोघी ट्रॅक्टरमध्ये बसल्या. मेंगडेवाडी रस्त्याच्या तीव्र उतारावर हा ट्रॅक्टरवरीला चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झालयाने भीषण अपघात झाला. ट्रॅक्टरट्रॉली दोघी बहिणींच्या अंगावर कोसळला. त्या दोघेही उसाखाली दाबल्या गेल्या. त्याच एका बहीणाचा जागी तर दुसऱ्या बहिणीचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.

ट्रॅक्टर चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मेंगडेवाडीतील रस्त्यांची झालेली दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.साधारण चार किमी परिसरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. यापूर्वीही या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत.

Nashik | थकबाकीपोटी वीज तोडली, पठ्ठ्यांनी आकडे टाकले, 9 जणांवर महावितरणची काय कारवाई?

UP Elections | अखिलेश यादवांच्या नावे किती संपत्ती? जाणून घ्या बँक बॅलन्स, गाडी बंगला याविषयी सविस्तर!

विमानदेखील उतरू शकेल असे रस्ते बांधले, विकास झाला पाहिजे पण वरवर काम करून चालणार नाही; नितीन गडकरींच्या कानपिचक्या