पुणे- दुरुस्तीचे खोटे कारण सांगत सय्यद नगर रेल्वे गेट नंबर सात हे कायमचे बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलिस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली आणि पोलिसांनी आंदोलकांना रेल रोको करण्यास रोखून धरले. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
नागरिकांची होतेय गैरसोय
पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन भाजपच्या आमदाराने हे गेट बंद केले आहे. गेल्या दोनशे वर्षांपासून सुरु आहे. या गेटमधून दोन लाखून अधिक नागरिकांची दररोज जाण्यायेण्याची सोय होत होती. मात्र गेट बंद केल्यान नागरिकांना मोठ्या नागरिकांना सोईचा सामना करावा लागत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.
रिक्षा व्यवसायिकांना फटका
या गेटमधून आसपासच्या बारा वाड्यामधील नागरिक ये-जा करतात. या परिसरातील स्थानिक नागरिक तसेच व्यवसायिक रिक्षा चालक यांनाही या गेटमधून वाहतुकीसाठी मोठ्याप्रमाणात उपयोग होत होता. मात्र गेट बंद असल्याने त्याचा व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. हे गेट खुले न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे. आंदोलनात यामध्ये माजी नगरसेवक फारुक इनामदार, नगरसेवक योगेश ससाने, डॉक्टर शंतनु ,जगदाळे कलेश्वर घुले,संजय शिंदे,सागर भोसले, अविनाश काळे, कबीर शेख, प्रणव राजे भोसले, अर्जुन सातव, बाळासाहेब ससाने, सुप्रिया इनामदार , महेश सातव, शितल सातव, मीनाताई थोरात ,वैष्णवी सातव, मंदाकिनी सुतार यांच्यासह हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
Nashik Corona : नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची 10 हजारांकडे वाटचाल; जाणून घ्या आजची स्थिती