प्रदीप कापसे, पुणे, दि. 21 नोव्हेंबर | मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छतीसगड, मिझोरम या राज्याच्या विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. तीन डिसेंबर रोजी निकाल येणार आहे. ही निवडणूक म्हणजे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेची सेमीफायनल म्हटली जात आहे. भाजप, काँग्रेस आणि दोन्ही पक्षांच्या आघाडीत असलेले विविध पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या कामाला लागली आहे. या निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार आहे? यासंदर्भात रणनीती तयार करण्यासाठी एक अहवाल तयार करण्यात आला आहे. तो अहवाल राज ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांची राज ठाकरे उद्या बैठक घेणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे लागले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे पुणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी दोन ते तीन दौरे पुण्याचे केले आहेत. तसेच अमित ठाकरे यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. राज्यात मनसेने पाहणी करुन एक अहवाल तयार केला आहे. राज्यातील २० लोकसभा मतदारसंघाचा हा अहवाल आहे. हा अहवाल राज ठाकरे यांना सादर करण्यात आला आहे. मनसेने लोकसभा निवडणूक लढवावी, अनेक भागांत पक्षाला चांगला प्रतिसाद असल्याचे मत निरीक्षकांनी या अहवाल व्यक्त केले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीचा चेंडू आता राज ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे.
लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात राज ठाकरे बुधवार २२ नोव्हेंबर रोजी बैठक घेणार आहे. लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांची राज ठाकरे बैठक घेणार आहे. या बैठकीला सकाळी ९ वाजेपासून सुरुवात होणार आहे. दोन दिवसांत आढावा घेवून राज ठाकरे लोकसभा निवडणुकीची रणनीती आखणार आहे. या बैठकीत मतदार संघातील संभाव्य उमेदवार, त्यांना अनुकूल असणारे वातावरण यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. यामुळे मनसे कार्यकर्त्यांचे बैठकीकडे लक्ष लागले आहे.