पुणे : पुण्यात आजच्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेची जोरदार तयारी करण्यात आलीय. राज ठाकरेंची ही सभा (Pune MNS) गेल्या तीन सभांसारखीच वादळी होण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची बीकेसीत सभा पार पडली या सभेत त्यांनी राज ठाकरेंना पिक्चरमधल्या मुन्नाभाईची उपमा देत खिल्ली उडवली. तर बाळासाहेब झाल्यासरखे वाटणार अनेकजण सध्या फिरत आहे. कध हिंदुत्वाचा मुद्दा घेतात. कधी मराठीचा, म्हणत राज ठाकरे यांना थेट डिवचलं होतं. त्यामुळे राज ठाकारे पुण्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे ऐनवेळी राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगिती केला. त्यावरही ते खुलेपणे बोलणार आहेत. या दौऱ्याआधी बृजभूषण सिंह यांचा झालेला कडाडून विरोध आणि दौरा स्थिगित करण्याचे कारण या सभेत स्पष्ट होणार आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना तब्बल 13 अटी घातल्या आहेत. औरंगाबादेतल्या सभेलाही स्थानिक पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या मात्र यातल्या अनेक अटींचं पालन न झाल्याने राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता पुण्यात तरी अटींचं पालन होणार की औरंगाबादची पुनरावृत्ती? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.