शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने घेतली अजित पवार यांची भेट, बंद दाराआड खलबतं

| Updated on: Feb 24, 2024 | 8:39 AM

Ajit Pawar and Rajesh Tope | आमदार रोहित पवार कालवा समितीच्या बैठकीला आले आहे. सुप्रिया सुळे या बैठकीला आल्या आहेत. पाण्यासंदर्भात ही बैठक आहे. परंतु अजित पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात काय चर्चा होते का? हे स्पष्ट होणार आहे.

शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने घेतली अजित पवार यांची भेट, बंद दाराआड खलबतं
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अभिजित पोते, पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार सातत्याने चर्चेत आहेत. या बंडानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ही मिळाले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव घेतले. त्यांना तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले. त्याचे अनावरण आज होणार आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून पुण्यातील सर्कीट हाऊसमध्ये बैठका सुरु आहेत. त्याचवेळी शरद पवार गटाचे बडे नेते राजेश टोपे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारआड चर्चा झाली.

काय झाली भेटीत चर्चा

अजित पवार आणि राजेश टोपे यांची बैठक सर्कीट हाऊसमध्ये बंद दाराआड झाली. या चर्चेच्या दरम्यान अन्य कोणी उपस्थित नव्हते. राजेश टोपे अजित पवार यांना भेटून सर्किट हाऊस मधून निघाले. त्यानंतर राजेश टोपे यांना माध्यमांनी गाठले. त्यावेळी त्यांनी चर्चेचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला. यामुळे या भेटीत काय खलबंत झाले त्याची माहिती नाही. दरम्यान राजेश टोपे यांनी टीव्ही ९ मराठीकडे या भेटीबाबत स्पष्टीकरण केले आहे. मी अजित पवारांना भेटलो नाही. मी त्या सर्कीट हाऊसवर मुक्कामी होतो, असे त्यांनी म्हटले आहे.

कालवा समितीच्या बैठकीत महत्वाच्या घडामोडी

आमदार रोहित पवार कालवा समितीच्या बैठकीला आले आहे. सुप्रिया सुळे या बैठकीला आल्या आहेत. त्यांनी पाण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आल्याचे सांगितले. पाण्यासंदर्भात ही बैठक आहे. परंतु अजित पवार, रोहित पवार यांच्यात काय चर्चा होते का? हे ही समजणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात चांगला कलगीतुरा रंगला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय होणार बैठकीत

कालवा समितीच्या बैठकीमध्ये पिण्यासाठी आणि शेतीसाठी उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन ठरवले जाईल. त्यानंतर अजित पवार दुपारनंतर बारामती लोकसभा मतदार संघातील, भोर, मुळशी आणि खडकवासला मतदार संघात ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत. तसेच काही पक्ष प्रवेश देखील होणार आहेत.