लोणावळा- जुना पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai highway)सातत्याने होत असलेलया अपघाताचा परिणाम स्थानिक नागरिकांवर होत आहे. वाढते अपघात शहरवासीयांच्या जीवावर उठू लागल्याने नागरिक आक्रमक होत एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीच्या(Pune-Mumbai highway) विरोधात जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखू धरत रास्ता रोको आंदोलन केलं. नागरिकांनी केल्या आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी(Trafiic) निर्माण झाली होती. आज रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात अन तीच वेळ रास्ता रोकोसाठी निवडण्यात आलेणे आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली होती.
लोणावळ्यातील स्थानिक नागरिकांनी अपघाताची वाढती संख्या कमी व्हावी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करावे अशी मागणी केली आहे. नागरिकांनी प्रामुख्याने एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीच्या विरोधात हे रस्ता रोको आंदोलन सुरु केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक ही मागणी करत आहेत. मात्र एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनी त्याला गांभीर्याने घेत नाही. तसेच त्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत महामार्गावरील कुमार रिसॉर्ट चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केलं.
यावेळी नागरिकांनी चला एका दिवस एकत्र येऊ आपल्या मुलांचे व निष्पांचे जीव वाचवू असे फलक लिहीत आयआरबीच्या बेजवाबदार व हलगर्जी पणामुळे बलवण ते खंडाळा मुंबई पुणे महामार्गाला कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच नसल्याने विद्यार्थी व नागरिकांचे निष्पाप बळी जात आहेत. मॅन शक्ती ते खंडाळा रोडवर रस्ता दुभाजक बसवावेत , पाठ दिव्यांची सोय करावी , अपघात स्थळांवर स्पीडब्रेकर बसवावेत, मनशक्ती ते दुसरा पेट्रोलपंप रस्त्याचे रुंदीकरण व्हावे शी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
VIDEO | राजकारणात जो आपला विरोध करतो, तो उद्या आपल्या सोबतही असेल, कोश्यारींचं सूचक वक्तव्य