पिंपरी- पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police ) लष्कर विभागाचे दिल्लीतील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे जॉईंट डायरेक्टर (Joint Director of Border Road Organization) राजेशकुमार दिनेशप्रसाद ठाकूर ( Rajesh Kumar Dinesh Prasad Thakur)यांना अटक करण्यात आलीये. त्यामुळे लष्कर विभागात खळबळ उडाली आहे. स्वतः पेपर सेट करणाऱ्या ठाकूर यांनीच पेपर फोडल्याच पिंपरी चिंचवड पोलिसांनी समोर आणले आहे. ठाकूर यांनी पेपर फोडण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी केली होती.
असा केला घोटाळा
जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स अर्थात जीआरईएफ विभागातील स्टोअर किपर टेक्निकल आणि मल्टी स्किल वर्कर ड्रायव्हर अर्थात व्हेईकल मेकॅनिक या पदांच्या परीक्षेसाठी हा पेपर होता. मार्चमध्ये पेपर तयार करण्यात आला तर 31 ऑक्टोबर 2021मध्ये ही परीक्षा पार पडली होती. सुरुवातीला 36 परीक्षार्थींना पेपर पुरविल्याच समोर आलं होतं. आता तपासात हा आकडा वाढू साठवर पोहचला आहे. 4 जानेवारीला आर्मी ऍन्टीलिजेस ब्युरोने सापळा रचून तिघांना ताब्यात घेत, सांगवी पोलिसांकडे सुपूर्त केलं होतं.
ठाकूर यांना अटक केल्याने लष्कर विभागात खळबळ
त्यावेळी निवृत्त लायन्स नाईक सतीश डहाणे, निवृत्त मिस्त्री श्रीराम कदम आणि एजंट अक्षय वानखेडे यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता. श्रीराम कदमच्या संपर्कात जॉईंट डायरेक्टर ठाकूर आले होते. तेंव्हा ठाकूर दिघीतील लष्करी विभागात कार्यरत होते. तेंव्हाची ओळख कायम होती, त्यातूनच पुढे पेपर फोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली. यासाठी ठाकूर यांनी पुणे विमानतळावर नऊ लाख रुपये स्वीकारले तर मुलाच्या खात्यावर पाच लाख रुपये पाठविले. अमेरिकेच्या हवॉर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सध्या त्यांचा मुलगा शिकतोय. त्याचा यात संबंध नसल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात दिसून येतंय. पण ठाकूर यांना अटक केल्याने लष्कर विभागात खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे.
Jay Bhim | सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाचा जगभरात डंका, आता थेट ऑस्करच्या शर्यतीत !