Pune Aircraft Crashed | सलग दोन अपघातानंतर विमान ट्रेनिंग सेंटरवर मोठी कारवाई

| Updated on: Oct 24, 2023 | 12:11 PM

Pune Aircraft Crashed | पुणे जिल्ह्यातील बारामती एअरपोर्टवर असलेल्या रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकादमीच्या विमानाचा अपघात झाला होता. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मोठी कारवाई केली आहे.

Pune Aircraft Crashed | सलग दोन अपघातानंतर विमान ट्रेनिंग सेंटरवर मोठी कारवाई
aircraft
Follow us on

पुणे | 24 ऑक्टोंबर 2023 : पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग ही प्रशिक्षण संस्था आहे. या प्रशिक्षण संस्थेच्या दोन विमानांचा चार दिवसांच्या अंतराने अपघात झाला. रविवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी बारामती तालुक्यातील गाडीखेल गावात विमान कोसळले होते. त्यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी विमानाचा अपघात झाला होता. सलग झालेल्या या दोन अपघातानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रकरणात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. यासंदर्भातील ई-मेलने डीजीसीएचे उड्डान प्रशिक्षण निर्देशक कॅप्टन अनिल गिल यांनी माहिती दिली.

काय केली कारवाई

रेडवर्ड रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरचा देशभरातील परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात कंपनीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत कंपनीच्या विमानाचा झालेला हा पाचवा अपघात आहे. चार दिवसांतच झालेला दुसरा अपघात आहे. यामुळे आता डीजीसीए कंपनीच्या विमानांचे सखोल परीक्षण करणार आहे. तसेच प्रशिक्षकांची योग्यता आणि अधिकारांची तपासणी करणार आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत देशभरात कंपनीचा परवाना निलंबित राहणार आहे.

बारामती तालुक्यात रविवारी झाला होता अपघात

रेडवर्ड रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरच्या विमानाचा रविवारी अपघात झाला होता. बारामती तालुक्यातील गाडीखेल गावात हे विमान कोसळले होते. या अपघातात प्रशिक्षक आणि प्रशिक्षण घेणारा दोन्ही जण जखमी झाले होते. त्यांना गावकऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमानाचे लॅण्डीग करत असताना हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

त्यापूर्वी गुरुवारी पुणे जिल्ह्यातील कटफल गावाजवळ या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता. त्या अपघातामध्येही पायलट आणि को-पायलट जखमी झाले होते. अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयच्या टीमने चौकशी केली होती. या दोन्ही अपघातांचा अहवाल डीजीसीएकडे दिल्यानंतर कंपनीचा परवाना निलंबित करण्याची कारवाई झाली. कंपनीच्या विमानांच्या झालेल्या या अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. सुदैवाने दोन्ही अपघातामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही.