पुणे- पुणेकरांना असणारी घराची चिंता आता लवकरच मिटणार आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्विकृतीचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या 4 हजार 222 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात झाली. जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघणार आहे. पुणे म्हाडाची ‘जानेवारी 2022-ऑनलाईन सोडत’ योजना राज्यातल्या अनेक गरजूंचं, पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे.
म्हाडा अंतर्गत पुणे आणि पिपरी-चिंचवड मधील 2 हजार 823 सदनिकांसाठी 20टक्के सर्वसमावेशक योजनेंर्तगत 1हजार 399 सदनिका अश्या एकूण 4 हजार 222 सदनिका असणार आहेत.
या परिसरात असणार सदनिका
म्हाडा अंतर्गत काढण्यात आलेल्या सदनिकांचा समावेश या परिसरात असणार आहे. यात पुण्यातील येवलेवाडी , मोहम्मदवाडी , कोथरूड ,आंबेगाव बुद्रुक, धानोरी, लोहगाव , वाघोली फुरसुंगी खराडी घोरपडी या परिसरात असतील. तर पिंपरी चिंचवडमधील दिघी, चऱ्होली , चिखली , किवळे, मोशी , पुनावळे , वाकड, चाकण , पिंपरी, रावेत , वाघिरे , बोऱ्हाडेवाडी, ताथवडे, चोविसागाव , थेरगाव , डुडुळगाव येथे असणार आहेत.
असा करा अर्ज
16 नोव्हेंबर, सकाळी 9 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीनं नोंदणीची व अर्जास सुरुवात .
16डिसेंबर 2021 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत.
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर रात्री 11 वाजून59 मिनिटांपपर्यंत असणार आहे.
ऑनलाईन पेमेंट स्वीकृती दि. 17 डिसेंबर 2021 रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे.
बँकेत आरटीजीएस / एनएफएफटी द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिवस 20 डिसेंबर 2021 (बँकेच्या कार्यालयीन वेळेप्रमाणे ) असणारा आहे.
यावेळी होणार सोडत
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादी 28 डिसेंबर2021 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध होणार आहे.
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादीची प्रसिद्धी 4 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
अंतिम सोडत 7 जानेवारी 2022 रोजी , पुणे ,म्हाडा कार्यालय येथे होईल.
सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीतील अर्जाची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर 7 जानेवारी 2022 ला सायंकाळी 7वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.
हेही वाचा
Bank Holidays: ‘या’ सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!
सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले?, राजकारणी आहात, कॅरेट तपासत बसू नका; अनिल परबांचा टोला