पुणे- शहरात मनसे शहर (MNS) पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत राज ठाकरे याच्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली. उद्या 11 वाजल्यापासून अयोध्या दौऱ्याच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे, नाव नोंदणीसाठी आधारकार्ड घेवून पक्ष कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्यातून अयोध्या(Ayodhya) तयारीची मनसैनिकांना माहिती दिली जाणार आहे. आज शहर पदाधिकाऱ्यांची बैठक ही शाखा अध्यक्षांपासून ते शहर अध्यक्षपदापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा होता. या मेळाव्यामध्ये नव्याने नियुक्त झालेल्या शहराध्यक्षांचा सत्कारही करण्यात आल्याची माहिती मनसे नेते बाबू वागसकर (Babu Wagaskar)यांनी दिली आहे.
या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक आणि अयोध्या दौऱ्यावर चर्चा केली जाणार आहे. मात्र या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेतून मनसे कोअर कमिटीचे सदस्य वसंत मोरे यांचे नाव वगळण्यात आल्याचे समोर आले होते. यानंतर वसंत मोरे यांनी ही स्थानिक नेत्यांकडून जाणीवपूर्वक हे कृत्य केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. यावर नाराजीही व्यक्त केली होती. बैठक सुरु झाल्यानंतर तब्बल दीड तासांनी वसंत मोरे हे बैठकीसाठी दाखल झालेले दिसून आले आहे.
याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र कारण्यात आलेली आंदोलने, पुढील कार्यक्रमाची दिशा तसेच कार्यकर्त्याच्या व्यथा यावरचर्चा झाली. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत पदाधिकार्यांनी नेमकं कसे काम केलं पाहिजे यावर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.