पुणे – शहरात पाकीटमारी, सोनसाखळीच्या घटनासोनटच मोबाईल चोरीच्या घटनाही घडताना दिसून येत आहेत. गर्दीच्या ठिकाणे हेरत चोरट्यांकडून मोबाईलवर डल्ला मारला जात आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात मोबाईलची चोरीच्या घटना घडत असल्यातरी त्यांचा तपास होताना दिसत नाही. मोबाईल चोरीच्या घटनांच्या तपासाबाबत पोलिसांमध्येही अनास्था असलेली दिसून आलेली आहे. गेल्या वर्षभरात शहरात तब्बल 29 हजार 829 मोबाइलची चोरीला गेले मात्र त्यातील केवळ 499 मोबाईलचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षभरात हातातून मोबाईल हिसकावून नेल्याच्या तब्बल 94 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
मोबाईल हरवल्यानंतर या गोष्टी करा
मोबाईल हरवला अथवा चोरीला गेल्यानंतर मोबाईल कंपनीशी संपर्क आधून आपले सीमकार्ड ब्लॉक करा. यामुळे चोरट्यांच्या हाती आपले मोबाईल मध्ये असलेले बँकेचे पासवर्ड लागू नये यासाठी आपला ईमेल ओपन करून त्यातून सर्व फॉरमॅट मारा. पोलीस दलाच्या संकेतस्थळावर जाव तिथे मेथे लॉस्ट अँड फाउंड वर मोबाईल नंबर, ईएमआय नंबर व मोबाईलची माहिती द्या. ज्या जागेवर मोबाईल हरवला आहे त्या जागेचे नाव , पोलीस ठाणे व तुमचा नंबर नमूद करा हरवल्याची माहिती द्या , तिथेच तुम्हाला मोबाईल हरवल्याच्या तक्रारीचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळेल.
चोर या अशी करतात मोबाईलची विक्री
मोबाईलची चोरी केल्यानंतर चोर मोबाईलच्या किमतीनुसार त्यांची विक्री करायची हे ठरवले जाते. मोबाईल जर अत्यंत कमी किमतीचा असेल तर शहरातच गरीब लोकांना त त्याची विक्री केली जाते. मोबाईल जर महाग असले तर त्याचा ईएमआयनंबर बदलून परराज्यात विक्री करतात. महत्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी मोबाईल ट्रेसिंगला लावलेले असतात.
Special Report | कोरोना लस न घेणाऱ्यांनी दुसरी आणि तिसरी लाट आणली का?
धक्कादायक! हत्तीला आला राग, पुढे जे झाले ते पाहून नेटकऱ्यांचाही उडाला थरकाप
Special Report | बाईकचं इंजिन, ट्रॅक्टरची करामात, सांगलीच्या पाटील-जाफर जोडीचा भन्नाट जुगाड