प्रदीप कापसे, पुणे : संरक्षण संशोधन संस्थेत (DRDO) मध्ये उच्च पदावर असलेले प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. व्हॉट्सॲप आणि व्हॉईस मेसेजद्वारे ते पाकिस्तानशी संपर्कात होते. तसेच त्यांनी परदेश दौरेही केल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२२ पासून ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात होते. मुंबई एटीएसनंतर आता संशोधन आणि विश्लेषण विभाग (रॉ)कडून त्यांची चौकशी केली गेली.
आता ‘रॉ’कडून चौकशी
संशोधन आणि विश्लेषण विभाग म्हणजे ‘रॉ’कडून आता प्रदीप कुरुलकर यांची चौकशी केली जात आहे. त्यांचे जप्त केलेल्या लॅपटॉप, तीन मोबाईल आणि संगणकाची हार्ड डिस्कमधून काय माहिती मिळाली, त्याचे विश्लेषण रॉचे अधिकारी करत आहेत. तसेच पाकिस्तानमध्ये ते कोणाच्या संपर्कात होते, त्याची माहिती जाणून घेत आहेत. पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये ते अडकले? हे ही जाणून घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.
अनेक प्रश्न विचारले
प्रदीप कुरुलकर यांनी रॉच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. ते पाकिस्तामध्ये कोणाच्या संपर्कात होते, आतापर्यंत त्यांनी काय काय माहिती दिली? गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक परदेश दौरे केले. या दौऱ्यात त्यांनी कोणाची भेट घेतली? याची माहिती अधिकारी काढत आहेत.
निवृत्त होण्यास फक्त सहा महिने
डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅपमध्ये अडकले. त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप आहे. त्यांना निवृत्त होण्यासाठी फक्त 6 महिने बाकी आहेत. परंतु ते पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील एका महिलेच्या संपर्कातही होते. DRDO ची व्हिजिलेंस व इंटीलिजेंस टीम अनेक महिन्यांपासून त्यांच्यांवर नजर ठेवून होती. डीआरडीओ मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर एटीएसने गुरुवारी त्यांना अटक केली.
उच्च पदावर काम आणि पुरस्कार
डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी सहा वर्षे भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्यांसोबत काम केले. १९९८ मध्ये झालेल्या अणूचाचणी दरम्यान जे ३५ वैज्ञानिक होते, त्यात कुरुलकर यांचा समावेश होता. त्यांना २००० मध्ये सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठी विज्ञान दिन पुरस्कार मिळाला होता. २००२ मध्ये आत्मनिर्भरतेमध्ये उत्कृष्ठतेसाठी डीआरडीओ अग्नी पुरस्कार, २००८ मध्ये आकाशसाठी पथ ब्रेकिंग संशोधन पुरस्कार, उत्कृष्ट तंत्रज्ञान विकासासाठी डीआरडीओचा पुरस्कार मिळाला होता.
हे ही वाचा
पुणे डीआरडीओ संचालकाने पाकिस्तानाला पुरवली गुप्त माहिती, एटीएसला तपासात काय काय मिळाले?
निवृत्तीस सहा महिने, डॉ.कलाम यांच्यांसोबत केले काम…कसे अडकले पाकिस्तानच्या हनीट्रॅपच्या जाळ्यात
कराचीमधील हसीना, पुणे शहरातील दिवाना…सुरु झाली प्रेमकथा अन् घडली अद्दल