पिंपरी – पिंपरी चिंचवडमधील पुनावळे गावात उबेर शेअर बाईक (Uber share bike) चालकाला रिक्षा चालकांकडून(Auto Driver) गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन रिक्षा चालकांनी केलेल्या मारहाणीत अंकुश कृष्णा सूर्यवंशी (26रा. साईनाथ कॉलनी, विनायक नगर, नवी सांगवी, मूळ रा. घाणव, ता. पाटण, जि. सातारा) मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी (Police) शरणबसप्पा शामराव पांचाळ (वय 36, दोघेही रा. कोयतेवस्ती, पुनावळे), हनुमंत बिभीषण माने (वय 23, रा. पुनावळे) या दोघांना अटक केली आहे तर तिसरा आरोपी बाबुराव शामराव पांचाळ (वय 42) घटना स्थळावरून फरार झाला आहे.
अशी घडली घटना
शहरातील पुनावळे परिसरात पीडित अंकुश सूर्यवंशी हा परवाना धारक वाहन चालक आहे. उबेर शेअर बाईकद्वारे प्रवासी वाहतूक करण्याचे काम करतात मात्र उबेर शेअर बाईकमुळे त्या परिसरातील स्थानिक रिक्षा चालकांचा धंदा होत नव्हता. त्यामुळे स्थानिक रिक्षा चालकांच्या मनात त्यांच्याविषयी राग होता. यावरून शाब्दिक चमकही उडाली होती. मात्र पीडित अंकुश सूर्यवंशी यांनी आपले काम सुरूच ठेवले होते. याचाच राग- मनात धरून घटनेच्या दिवशी आरोपींनी पीडित अंकुश सूर्यवंशी यांनी उबेर बाईक शेअर या मोबाईल ॲप्लिकेशनवरुन बोलावून घेतले. त्यानंतर रिक्षा चालकांनी त्यांना धमकावले व ‘आम्ही उगीच रिक्षाचे परमिट काढतो का ? तू आमचे सिट घेऊन जातो,’ असे म्हणत लाथा बुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी कृष्णा यांना एका आरोपीने सिंमेटचा ब्लॉक मांडीवर मारुन खाली पाडले व लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच, शर्टाची कॉलर पकडली व मोबाईलवर दगड टाकून तो स्वतःलाच फोडायला लावला तसेच फिर्यादी कृष्णा यांना शिवीगाळ करून पुन्हा उबेर शेअर बाईक मध्ये काम केलंस तर जीवे मारु अशी धमकी दिली.
वडिलांमुळे आईने आत्महत्या केल्याचा राग, औरंगाबादेत 24 वर्षीय मुलाकडून बापाची हत्या
शाहरुख थुंकला की फुंकर ? मोदींचा फोटो ट्विट करत ऊर्मिला मार्तोंडकर म्हणतात, सबको सन्मती दे भगवान !
लता मंगेशकर यांच्या अस्थी आदिनाथ मंगेशकर प्रभुकुंजवर घेऊन जाणार