लस घेतली असेल तरी नव्या व्हेरीयंटचा धोका आहे का? तज्ज्ञांनी दिले उत्तर

| Updated on: Dec 21, 2023 | 12:27 PM

Maharashtra Corona Update | भारतात कोरोनाचा नवीन व्हॅरीयंट मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोरोनाचा सबव्हॅरीयंट JN.1 ची पहिली केस केरळमध्ये मिळाली आहे. त्यानंतर देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यासंदर्भात डॉ. अविनाश भोंडवे यांनी माहिती दिली आहे.

लस घेतली असेल तरी नव्या व्हेरीयंटचा धोका आहे का? तज्ज्ञांनी दिले उत्तर
corona
Follow us on

अभिजित पोते, पुणे दि.21 डिसेंबर | दोन वर्ष कोरोनामुळे जग हौराण झाले होते. त्यावेळी लस नव्हती आणि औषधे मुबलक प्रमाणात नव्हती. यामुळे लॉक डाऊन नावाचा प्रकार सुरु झाला. आता पुन्हा कोरोनाचा नवीन व्हॅरीयंट JN.1 भारतात दाखल झाला आहे. या कोरोना व्हेरीयंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये मिळाले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा पहिला रुग्णही केरळमध्ये मिळाला होता. महाराष्ट्रात नवीन व्हेरींयट दाखल झाला आहे. सिंधुदुर्गात ‘जेएन1’ चा रुग्ण मिळाला आहे. तसेच पुणे, मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यामुळे ‘टीव्ही ९ मराठी’ने डॉ. अविनाश भोंडवे यांनी नव्या जेएन 1 व्हेरियंटसंदर्भात माहिती दिली.

लस घेतली असेल तरी धोका

पुणे डॉ. अविनाश भोंडवे यांनी वैद्यकीय शास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाची महामारी संपली आहे. परंतु कोरोना संपलेला नाही. कोरोनाचे नवीन, नवीन व्हेरियंट येतच राहणार आहेत. आता आलेला JN1नवा व्हेरियंट अमेरिकेत सप्टेंबरपासून आला. हा नवा व्हेरियंट ओमीक्रोन व्हेरियंटचाच एक भाग आहे. त्याला ओमीक्रोनचा सब व्हेरियंट म्हणता येईल. JN 1 व्हेरियंट देखील अतिशय वेगाने पसरतो. त्याचा मृत्यूदर जास्त नाही, परंतु तो वेगाने पसरत आहे. ज्यांना पूर्वी होऊन गेला आहे त्यांना देखील लागण होते किंवा लस घेतली असेल तरी देखील या नव्या व्हेरियंटची लागण होते.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत डॉ. अविनाश भोंडवे

डॉ. अविनाश भोंडवे वैद्यकीय विषयांवर हे मराठीत लेखण करतात. ते व्यवसायाने डॉक्‍टर आहेत. त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून १९८३ मध्ये एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर २०१७ मध्ये एफसीजीपी पदवी घेतली. त्यांनी आरोग्याची गुरुकिल्ली, आरोग्यातील अंधश्रद्धा, आरोग्यावर वाचू काही, तारुण्यगान, तारुण्याच्या उंबरठ्यावर, लाखातले एक आजार, वैद्यकीय उपकरणांच्या जगात, वयात येताना, तरुण होताना, On the Threshold of Youth, कोरोनाचा चक्रव्यूह, कोरोना प्रश्नोत्तरे, स्त्रियांचे आजार आणि उपचार या विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.