‘विचारांची दिशा ही नराचा नारायण घडवणारी असावी, नराचा नराधम घडवणारी नसावी’, सरसंघचालकांचं प्रतिपादन

| Updated on: Dec 20, 2024 | 10:08 PM

सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसेवा स्कूलच्या कार्यक्रमात शिक्षणाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्माणात त्याचे योगदान यावर भाष्य केले. शिक्षण हा व्यवसाय नसून एक सामाजिक जबाबदारी आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि चांगले संस्कार हे राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

विचारांची दिशा ही नराचा नारायण घडवणारी असावी, नराचा नराधम घडवणारी नसावी, सरसंघचालकांचं प्रतिपादन
सरसंघचालक मोहन भागवत
Follow us on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लोकसेवा स्कूलच्या कार्यक्रमात शिक्षण, शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षणातून काय साध्य करता यायला हवं, याबाबत मार्गदर्शन केलं. “आजचा हा मंच कर्मवीरांचा मंच आहे. कर्मवीरांनी सागितलं आहे, करणारा एक वर्ग आहे. टाळ्या पिटनारा एक वर्ग आहे, पण असे असून चालत नाही सगळे करणारे असावे लागतात. आपल्या देशात बिघडवणारी पुष्कळ आहेत. त्यापेक्षा घडवणारे देशात खूप आहेत, त्यामुळे इतर देशासारखी वाताहत आपल्या देशाची झाली नाही”, असं मोहन भागवत म्हणाले. तसेच “सेतू करण्यासाठी सगळ्यांनी पुढे आले पाहिजे. पूर्णा म्हणजे अंश महत्वाचा असतो. त्यामुळे हे काम आपल्या सर्वांचे आहे. व्यवस्था शिक्षणात बाधक असता काम नये. ती साधक असली पाहिजे. हे करू नका, ते करू नका, असं सांगू नये. त्यामुळे प्रयोग बंद होतात”, असं मत मोहन भागवत यांनी मांडलं.

“नवीन शिक्षण पद्धती आता आली. ती पूर्वी यायला हवी होती. त्याची चर्चा सुरू होती. मुलांना आता घरात पाहुणे आल्यावर जेवण कसं वाढायचे? यापासून सुरुवात करावी लागणार आहे. शिक्षण हे सर्वांनी मिळून पेलण्याचं शिवधनुष्य आहे. शिक्षणाचे पोषण सगळ्या समाजाने केले पाहिजे. मनाची, बुद्धीची धारणा ठीक पाहिजे. शिक्षण आवश्यक आहेच, पण त्याच्यावाचून आडत नाही. पण मनुष्य होण्यासाठी शिक्षण होणे गरजेचे आहे, जन्मताच सगळे पशू असतात”, असं मोहन भागवत म्हणाले.

‘शिक्षण हा व्यवसाय नाही’

“विचाराची दिशा नराचा नारायण घडवणारी असावी. नराचा नराधम घडवणारी नसावी, माणूस घडवण्यासाठी शिक्षण देणे आणि घेणे गरजेचे आहे. बुद्धी नीट हवी, कधी कधी उलटी चालत असते. बुद्धी कधी कधी स्वार्थ मनात आणते. उत्कृष्ठता आणि गुणवत्ता जपली तर यश मिळते, असं मोहन भागवत म्हणाले. तसेच “शिक्षण हा व्यवसाय नाही. उत्तम शिक्षण घेतल्यानंतर पाहिजे तेवढे कमवा. मात्र त्यानंतर स्वतःला पाहिजे. तेवढे ठेवून उरलेले समाजाला परत द्यायचे. हा संस्कार हवा”, असं देखील मोहन भागवत यांनी ठणकावून सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“देशात कर्तृत्व आहे. पाठीमागे काही विचारांची जळमटे येतात. आपलं सनातनत्व जपून आपणही पुढच्या पिढ्यांकरता याची देही याची डोळा हा देश साकार झालेलं आपण पाहू शकू”, असं मत यावेळी मोहन भागवत यांनी मांडलं.