आमदारकीच्या हट्टापायी ठाकरे कुटुंबासोबतची नाळ तुटणार, शिवसेना अखेर ‘या’ नेत्यावर कारवाई करणार

| Updated on: Feb 11, 2023 | 12:32 AM

शिवसेनेचे अनेक मातब्बर नेते, शिवसैनिक आज 'मातोश्री'पासून दूर गेले आहेत. आतादेखील पुण्यातील एक बडा नेता ठाकरे कुटुंबापासून दूर जाण्याची शक्यता आहे. त्यामागील कारण देखील तसंच आहे.

आमदारकीच्या हट्टापायी ठाकरे कुटुंबासोबतची नाळ तुटणार, शिवसेना अखेर या नेत्यावर कारवाई करणार
Follow us on

पुणे : शिवसैनिकांसाठी (Shiv Sena) ‘मातोश्री’ हे श्रद्धास्थान आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शिवसैनिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आजही लाखो शिवसैनिक उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) तितकंच प्रेम करतात. शिवसैनिकांचं ठाकरे कुटुंबासोबत वेगळी नाळ आहे. खरंतर हे भावनिक नातं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अतिशय अनपेक्षित अशा घटना घडत आहेत. शिवसेनेचे अनेक मातब्बर नेते, शिवसैनिक आज ‘मातोश्री’पासून दूर गेले आहेत. आतादेखील पुण्यातील एक बडा नेता ठाकरे कुटुंबापासून दूर जाण्याची शक्यता आहे. त्यामागील कारण देखील तसंच आहे.

पुण्यातील ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. खरंतर चिंचवडची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं ठरलं आहे. राष्ट्रवादीने या जागेवर नाना काटे यांना उमेदवारी दिलीय. पण राहुल कलाटे उमेदवारीसाठी जास्त आग्रही होते. त्यामुळे त्यांनी अर्ज दाखल केला. त्यांना पक्षाकडून अधिकृतपणे एबी फॉर्म देण्यात आलेला नसल्याने ते अपक्ष उमेदवार आहेत.

राहुल कलाटे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात आली. पण ते अर्ज मागे घेण्याच्या तयारीत नव्हते. विशेष म्हणजे त्यांची समजूत काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत: संपर्क प्रमुख सचिन अहिर यांना पाठवलं होतं. पण राहुल कलाटे यांनी सचिन अहिर यांची विनंती देखील ऐकली नाही. कलाटे यांनी अहिर यांचं ऐकून अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत सचिन अहिर यांनी स्वत: माहिती दिलीय.

हे सुद्धा वाचा

 

सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?

“शिवसेना भवनावरून पक्षाची प्रक्रिया होईल. ते गटनेते, नगरसेवक होते. यापुढे त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही”, असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं.

“सर्वांवर कारवाई होणार नाही. सरसकट कारवाई करणार नाही. सगळं पाहून कारवाई होणार”, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली.

“मागील वेळी जी मते मिळाली ती राष्ट्रवादी काँग्रेसची होती. त्यामुळे ह्यावेळी घड्याळ चिन्हला मत मिळेल. पर्यायाने महाविकास आघाडीला मिळेल”, असं अहिर यांनी सांगितलं.

“चिंचवडमधील मतदार हा समजदार आहे. त्यामुळे तिरंगी लढत होईल असं आज तरी वाटत नाही”, अशी भूमिका अहिर यांनी मांडली.

“पुण्यात भाजप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आणणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी सोप्पी नाही. त्यांच्या संदर्भात परत उत्तर देऊन त्यांचा प्रचार करणार नाही”, असं सचिन अहिर म्हणाले.

राहुल कलाटे यांना उद्धव ठाकरेंना फोन

अजित पवारांनी देखील सचिन अहिर यांना विनंती केली. उद्धव ठाकरेंचाही कलाटेंना फोन गेला. चिंचवडमध्ये ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर कलाटेंना भेटले. मात्र कलाटे ठाम राहिले. राहुल कलाटे आधी शिवसेनेत होते त्यांनी शिवसेनेकडूनही निवडणूक लढवलीय.

2019 मध्ये राष्ट्रवादीनं त्यांना चिंचवडमधून पुरस्कृत केलं होतं. त्यावेळी लक्ष्मण जगतापांना 1 लाख 50 हजार 23 मतं तर कलाटेंना 1 लाख 12 हजार 225 मतं मिळाली. 37 हजार 798 मतांनी विजय मिळवत जगतापांनी आमदारकीची हॅटट्रिक केली होती. मात्र 1 लाख 12 हजार मतं लक्षवेधी ठरली होती.