संभाजी भिडे यांना दंगली घडवण्याचं कंत्राट, ते भिडे नाहीत किडे; छातीवर हात मारत जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

| Updated on: Aug 20, 2023 | 1:34 PM

अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकीत त्यांच्या संस्थांबाबत चर्चा झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर त्यांना विचारण्यात आलं असता मला माहीत नाही बैठकीत काय चर्चा झाली, अस आव्हाड म्हणाले.

संभाजी भिडे यांना दंगली घडवण्याचं कंत्राट, ते भिडे नाहीत किडे; छातीवर हात मारत जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
jitendra awhad
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे | 20 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तो मनोहर भिडे आहे की काय? पण तो विकृत विचाराचा म्हातारा आहे, हेच खरं. तो भिडे नाही किडे आहे. त्याच्यावर कारवाई होणार नाही. हरयाणात जशी बिट्टू बजरंगीने दंगल पेटवली. तशी या भिडेला जबाबदारी दिली आहे दंगल पेटवण्याची. कसंही करून हिंदू-मुसलमान दंगल पेटव हे भिडेला सांगण्यात आलं आहे, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. संभाजी भिडेला विरोध करणारा महाराष्ट्रातील पहिला माणूस कोण? तो मीच आहे, असंही आव्हाड यांनी छातीवर हात मारत सांगितलं.

राष्ट्रवादीचं पुण्यात सोशल मीडिया शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. त्यासाठी आव्हाड पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी भिडेंवर टीका करतानाच राज्यातील विविध विषयावरही भाष्य केलं. पुढच्या वर्षी निवडणुकीच्या वेळी राज्यात दंगल घडवली जाणार असल्याचं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्याबाबत विचारलं असता, पुढच्या वर्षी कशाला? आताच दंगली होत आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तर, गहू 80-90 रुपये किलोवर जणार

कांदा आणि गहू निर्यातीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही. खरेदीदारांचे सरकार आहे. या देशाला शरद पवारांसारखे कृषिमंत्री पाहिजे. शरद पवार यांना जाण आहे. शेतकऱ्यांचा कळवळा आहे, असं आव्हाड म्हणाले. तसेच मागील वर्षी सांगत होते की, ” आम्ही जगाला धान्य पुरवू शकू…” आणि आज बातम्या येऊ लागल्यात की, भारत यंदा रशियाकडून गहू आयात करणारे आहे म्हणून…! गेल्या 50 वर्षात आपण पहिल्यांदाच गहू आयात करत आहोत. मग, गव्हाचं उत्पादन देशात घटलं की तयार होणारा गहू कोणाच्या मोठमोठ्या सायलोमध्ये साठवला जाणारे आहे? असं काही घडलं तर, गहू 80-90 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.

तटकरेंना इशारा

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे खासदार सुनील तटकरे यांनाही सुनावले. धमक्या द्यायच्या नाहीत. कोण काय बोलतंय ते बघू, असा इशाराच त्यांनी तटकरे यांना दिला.

रुग्णालय ताब्यात घ्या

ठाण्यातील घटनेवरून मंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारला आहे. त्यावर त्यांना विचारण्यात आलं असता आतापर्यंत एक हजार पेक्षा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री आपले आहेत. त्यांनी रुग्णालय आपल्याकडे घ्यावं. रुग्णालयाचा डीन पात्रता नसताना तिकडे बसलाय, असा आरोप त्यांनी केला.