शंकर देवकुळे, सांगली : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजेजवळ बायपासवर जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन पाच जण ठार झाले आहेत. कोल्हापूर जिह्यातील राधानगरीजवळ असलेल्या सरवडेचे सर्व मृत आहेत. राँग साईडने जाणाऱ्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि जीपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहे. मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर हा भीषण अपघात झाला आहे.
sangli accident
समोरासमोर धडक
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील सातजण जीपमधून सोलापूरकडे जात होते. त्यांची जीप मिरज जवळ आले असता राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने विटांनी भरलेले ट्रॅक्टर येत होते. त्यावेळी त्यांची जीप आणि टॅक्टर यांची समोरासमोर घडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरो थेट ट्रॅक्टरमध्ये घुसली.
sangli accident
काल महामार्ग सुरु आज अपघात
राष्ट्रीय महामार्गावर मिरजपासून सुरु होणार टप्पा मंगळवार १६ मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय महामार्ग अपघात झाला.
राज्यातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरत आहे. नेमकी कारणं काय? पाहू या…
…तर अपघात टाळणे शक्य
लोकांनी आणि सरकारी यंत्रणे ठरवल्यास या कारणांमुळे होणारे अपघात सहज टाळता येईल. यासंदर्भात साम, दाम, दंड, भेद अशा उपाययोजना करायला हव्या. त्यानंतर अपघाताचे प्रमाण कमी होईल. परंतु सरकारी यंत्रणा आपल्या पारंपारीक कामकाज पद्धतीनेच चालतात. वाहन चालवण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.