पुणे: पुण्यात तारादूतांचं आंदोलन चांगलंच तापलं आहे. सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर तारादूतांनी घोषणाबाजी सुरू केली असून त्यांना मराठा आंदोलकांचीही साथ मिळाली आहे. मराठा आंदोलकांनी या आंदोलनात सहभागी होऊन जोरदार घोषणा देत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलन अधिकच चिघळले आहे. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (SARTHI employees and maratha youth stage protest against Maharashtra government)
सारथी कार्यालयात संचालक मंडळाची बैठक सुरू आहे. त्यामुळे मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून तारादूतांची कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. त्याला मराठा आंदोलकांनीही पाठिंबा दिला असून या आंदोलनात भाग घेतला आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देतानाच संस्थेत शिरण्याचा प्रयत्नही केला. पण पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापटही झाली. सध्या आंदोलकांनी सारथीबाहेरच ठाण मांडलं असून घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने येथील वातावरण तापलं आहे.
काय आहे प्रकरण?
सारथी संस्थे तर्फे विविध उपक्रमांसाठी राज्यातील 480 जणांची तारादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. या तारादूतांना महिन्याला 18 हजार रुपये मानधनही दिले जाते. पण हा प्रकल्प स्थिगीत करण्यात आल्याने या तारादूतांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हा प्रकल्प पुन्हा सुरु करावा या मागणीसाठी या तारादूतांनी फेब्रुवारी महिन्यात उपोषणही केले होते. मात्र, तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे या तारादूतांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. (SARTHI employees and maratha youth stage protest against Maharashtra government)
पाच दिवसांचा ठिय्या
या आधी या तारादूतांनी 11 डिसेंबर रोजी पाच दिवसांचे ठिय्या आंदोलनही केलं होतं. सारथी समोरच झालेल्या या आंदोलनाची सरकारने म्हणावी तशी दखल घेतली नाही. त्यामुळे या आंदोलकांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं असून आता त्यांना मराठा आंदोलकांची साथ मिळाली आहे. (SARTHI employees and maratha youth stage protest against Maharashtra government)
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 21 December 2020https://t.co/5QLxgxiM2G #Top9news #MaharashtraNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2020
संबंधित बातम्या:
Pune | सारथी कार्यलयासमोर 5 दिवसांपासून तारादूतांचे ठिय्या आंदोलन
‘काँग्रेसला विरोधक लागत नाही’, निलेश राणेंचा टोला
मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा न मिळाल्यास ठाकरे सरकारचा प्लॅन बी तयार