बिबट्याने पुणे शहरात घुसून पाळीव कुत्र्याची केली शिकार, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

| Updated on: Mar 17, 2023 | 4:52 PM

बिबट्याचा मागील तीन वर्षांपासून पुणे परिसरातील अनेक भागांमध्ये खुलेआम वावर आहे. यामुळे भागामधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बिबट्याने पुणे शहरात घुसून पाळीव कुत्र्याची केली शिकार, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
leopard
Image Credit source: tv9marathi
Follow us on

पुणे : मानव आणि बिबट्या यांच्यांत संघर्ष सुरु असतो. जंगलात खाद्य मिळत नसल्यामुळे बिबटे अनेक ठिकाणी शहराकडे आपला मोर्चा वळवत आहे. आता आयटी सीटी अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील हिंजवडी भागातील फेज थ्रीमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची (leopard attack in pune) दहशत पाहायला मिळाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हिंजवाडी फेज थ्री पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरे गावातील शिंदे वस्तीत संभाजी जाधव यांच्या घरात शिरूर पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना भीती वाटत आहे.

बिबट्याचा मागील तीन वर्षांपासून अधिक काळ नेरे, जांबे आणि कासारसाई भागामध्ये खुलेआम वावर आहे. यामुळे भागामधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील स्थानिक नागरिक करत आहे. मात्र वनविभाग सातत्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने बिबट्याची दहशत या भागात अजूनही पाहायला मिळत आहे.

हिंजेवाडीत एक बिबट्या घुसला. त्याने घरात बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. कुत्रा आपला जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होता. परंतु बिबट्यापुढे त्याचे प्रयत्न अपूर्ण पडले. चैनने बांधलेल्या कुत्र्याला बिबट्याने ओढून नेले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना भीती वाटप आहे.

नाशिकमध्ये एक ठार

नाशिकमध्ये बिबट्याचे हल्ले सुरुच असून पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीचा जीव गेला आहे. बिबट्याने हल्ला करत गंभीर जखमी झाल्याने एका तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे ब्राह्मणवाडे येथील नवशु पांडुरंग कोरडे यांच्या गट नंबर 331 मध्ये कोरडे दाम्पत्य राहता. यावेळी त्यांच्या घराजवळील ओट्यावर त्यांची 3 वर्षीय मुलगी नयना नवशु कोरडे ही खेळत होती. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने या चिमुकलीवर हल्ला केला. या हल्ल्यात नयना गंभीर जखमी झाली.तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.