शहाजीबापू संजय राऊत यांच्यांवर बरसले, म्हणाले नागापेक्षा विषारी फुत्कार…

| Updated on: Feb 19, 2023 | 1:02 PM

शिंदे गटाचे आक्रमक आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राऊत राज्यातील जनतेमध्ये लोकशाहीविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शहाजीबापू संजय राऊत यांच्यांवर बरसले, म्हणाले नागापेक्षा विषारी फुत्कार...
Image Credit source: tv9
Follow us on

सोलापूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रविवारी गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी 2 हजार कोटींची डील झाली आहे. हा न्याय नाही. ही डील आहे. हा सौदा आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या विधानांवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिंदे गटाचे आक्रमक आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राऊत राज्यातील जनतेमध्ये लोकशाहीविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काय म्हणाले शहाजीबापू

हे सुद्धा वाचा

शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना जोरदार उत्तर दिलं आहे. “संजय राऊत खासदार आहेत. त्यांच्या सारख्या व्यक्तीने दोन हजार कोटींचे डील झाल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. या देशात केंद्रीय निवडणूक आयोगामुळे लोकशाही टिकून आहे. निवडणूक आयोगासारख्या संस्थांवर टीका करुन संजय राऊत जनसामान्यात लोकशाही विषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

नागापेक्षाही विषारी फुत्कार


निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शिंदे साहेबांनी दिलेल्या मजबूत पुराव्यामुळे लागला आहे. संध्या संजय राऊत यांची मानसिकता बिघडली आहे. संजय राऊत लोकशाही आणि समाजाची मानसिकता बिघडवण्याचं महापाप करत आहेत. हे महाराष्ट्राला शोभणार नाही. संजय राऊत नागापेक्षाही विषारी फुत्कार त्यांच्या तोंडातून टाकत आहे. महाराष्ट्र सुजान आहे. राज्यातील जनता संजय राऊत यांच्यांसारख्यांच्या विधानांवर कुठलीही भीक घालत नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

नेमके काय म्हणाले राऊत


संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हा गंभीर आरोप केला. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी दोन हजार कोटीचा व्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे लवकरच येतील. मी खात्रीने सांगतो ही डील झाली आहे. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी 50 लाख देतोय, आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी 100 कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

हा हिशोब करण्यासाठी 100 ऑडिटर लागतील. हा न्याय नाही. हे डील आहे. हा सौदा आहे. 2000 कोटी खर्च झाले. चिन्ह आणि पक्षाचं नाव विकत घेण्यासाठी किमान दोन हजार कोटी खर्च केल्याची माहिती त्यांच्या बिल्डरांनी मला दिली आहे.