Pune News : शक्ती कपूर याची पुणे शहरात झाली होती रॅगिंग, कोणत्या प्रसिद्ध स्टारने केली होती ही रॅगिंग

| Updated on: Sep 03, 2023 | 3:21 PM

shakti kapoor Pune news : रॅगिंगविरोधात आता कठोर कायदा झाला आहे. परंतु एक काळ असा होती की रॅगिंगमुळे काही जणांनी आपले जीवन संपवले होते. दोन स्टारमधील रॅगिंगचा प्रकाराचा खुलास केला अभिनेता शक्ती कपूर याने. ही रॅगिंग पुणे शहरात झाली होती...

Pune News : शक्ती कपूर याची पुणे शहरात झाली होती रॅगिंग, कोणत्या प्रसिद्ध स्टारने केली होती ही रॅगिंग
shakti kapoor
Follow us on

पुणे | 3 सप्टेंबर 2023 : चित्रपटांमध्ये नेहमी खलनायकाची भूमिका किंवा विनोद भूमिका साकारणाऱ्या शक्ती कपूर याचे शिक्षण पुणे शहरात झाले आहे. पुणे शहरातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे एफटीआयमध्ये त्याने अभिनयाचे धडे घेतले आहे. या शिक्षणादरम्यान रॅगिंगचा प्रसंग त्याच्यावर आला होता. त्या प्रसंगाचा किस्सा स्वत: शक्ती कपूर याने सांगितला. रॅगिंग करताना आपली केसही कापली गेली होती, थंड पाण्यात २० मिनिटे उभे केले गेले होते, असे एका मुलाखतीत शक्ती कपूर याने सांगितले.

अशी झाली होती ती पहिली भेट

शक्ती कपूर याने एका मुलाखतीत सांगितले की, एफटीआयमध्ये पोहचल्यावर माझ्याकडे एक बिअरची बॉटल होती. त्यावेळी मी स्वत:ला मोठा स्टार समजत होतो. मला हॉस्टेलमध्ये सोडण्यासाठी राकेश रोशन आले होते. त्यावेळी राकेश रोशन यांनी हॉस्टेलच्या बाहेर थांबलेल्या एका व्यक्तीला नमस्कार केला. त्यानंतर मी त्या व्यक्तीला बिअर ऑफर केली. परंतु त्यांनी नकार दिला. मग राकेश रोशन निघून गेले.

मग सुरु झाली रॅगिंग

राकेश रोशन जाताच त्या व्यक्तीने मला ओढून खोलीमध्ये नेले. सीनिअरला बिअर ऑफर कशी केली? याबद्दल जाब विचारला. त्यानंतर त्या व्यक्तीने इतर सहकाऱ्यांना माझे केस कापण्याचे सांगितले. २० मिनिटे थंड पाण्यात पोहण्याचे फर्मान सोडले आणि सकाळी पुन्हा दिल्लीत जाण्याचे आदेश दिले. ही रॅगिंग करणारा व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेता मिथून चक्रवर्ती होता.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर मदतही केली

पहिल्या दिवशी रॅगिंग केल्यानंतर मिथून चक्रवर्तीने मला मदतही केली. दुसरे सीनिअर माझी आणखी कडक रॅगिंग करणार होते? परंतु त्यापासून मिथून यांनी मला वाचवले. त्यांनी मला एका खोलीत बंद केले. त्यानंतर सीनिअरसोबत कसे वागावे? हे मिथून यांनी मला समजवले. त्यानंतर आमची नाती अधिक चांगली राहिली. काही चित्रपटांमध्ये आम्ही सोबत काम केले. परंतु त्यावेळी त्या रॅगिंगला मी घाबरलो होतो. परत जाण्याचा विचारही आला होता. परंतु मिथून यांनीच मला मदत केली.