सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात, २० वर्षांचे वैर विसरुन घेतली अनंतराव थोपटेंची भेट

| Updated on: Mar 11, 2024 | 6:59 AM

lok sabha election 2024: महाविकास आघाडीच्या उमदेवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहे. हरिश्चंद्री येथे त्यांनी सभा घेतली. त्यापूर्वी माळवाडी येथे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे या वेळी उपस्थित होत्या.

सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात, २० वर्षांचे वैर विसरुन घेतली अनंतराव थोपटेंची भेट
शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली.
Follow us on

योगेश बोरसे, पुणे  : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी त्याचा पक्षाचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झालेले नसताना शरद पवार यांनी त्यांची मुलगी बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भोर येथील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मुलीची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवार थांबले नाही. तिला निवडून आणण्यासाठी सर्वांची मोट बांधणी सुरु केली आहे. त्यासाठी २० वर्षांपासून राजकीय वैर असलेले अनंतराव थोपटे यांच्या घरी पोहचले. यामुळे बारामतीची लढत सोपी नसणार याची जाणीव शरद पवार यांना झाल्याची चर्चा रंगली आहे.

सभेपूर्वी शरद पवार अनंतराव यांच्या घरी

महाविकास आघाडीच्या उमदेवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहे. हरिश्चंद्री येथे त्यांनी सभा घेतली. त्यापूर्वी माळवाडी येथे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे या वेळी उपस्थित होत्या. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार बारामतीत ठिय्या मांडून बसले आहेत.

अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक

थोपटे आणि शरद पवार अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक आहेत. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. त्यावेळी भोरला त्यांनी सभा घेतली होती. या ठिकाणांवरुन अनंतराव थोपटे यांचा पराभव करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथराव खुटवड यांना निवडून आणले होते. त्यावेळी थोपटे कांग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते होते. ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार समजले जात होते. परंतु पराभव झाल्यामुळे त्यांची संधी हुकली. हा पराभव त्यांचा चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यानंतर २००४ मध्ये पुन्हा थोपटे विजयी झाले होते. परंतु सत्तेपासून कायम दूर राहिले. या दरम्यान शरद पवार आणि थोपटे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत राहिले.

हे सुद्धा वाचा

शरद पवार का भेटले?

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभेसाठी उमेदवार असण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात सुनेत्रा पवार भोरला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यामुळे थोपटे अजित पवार यांना पाठिंबा देता की काय? ही चर्चा सुरु झाली होती. परंतु आता थोपटे यांनी आपण महाविकास आघाडीचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले.