महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप झाले नाही. दोन्ही युती आणि आघाडीमध्ये वाद आहे. त्या वादावर अर्ज भरण्यास दोन दिवस शिल्लक असतानाही तोडगा निघाला नाही. तसेच कोणता पक्ष किती जागा लढणार त्यावर एकमत झाले नाही. त्यामुळे युती आणि आघाडीने जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही जाहीर केला नाही. महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांनी 85-85-85 असे जागा वाटपाचे सूत्र असणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब विखे यांनी 90-90-90 जागांचा फॉर्म्युला असल्याचे म्हटले. यासंदर्भात महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी कोण किती जागा लढवले हे मला काहीच माहीत नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बारामती विधानसभा मतदार संघातून युगेंद्र पवार याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीत काही वाद नाही. काही ठिकाणी दोन, दोन वाद उमेदवार दिले आहेत. त्यातून मार्ग काढण्यात येईल. कारण माघारी घेण्यासाठी अजून वेळ आहे. महाविकास आघाडीतील बहुसंख्य जागांवर एकमत झाले आहे. राहिल्या जागांवर आज तोडगा निघेल. तसेच शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष कोण किती जागा लढवले हे मला काहीच माहीत नाही.
महायुती सरकारची सत्ता अडीच वर्षांपासून आहे. त्यापूर्वी त्यांना कधी लाडकी बहीण आठवली नाही. लाडकी बहीण योजना चार महिन्यांपूर्वी आली. कारण लोकसभेत त्यांना मतदारांनी धडा शिकवला होता. त्यानंतर ही योजना आहे. त्यापूर्वी कधी त्यांची आठवण झाली नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
बारामतीमधून युगेंद्र पवार या युवा नेत्यास आम्ही उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीने सुप्रिया ताईंना बहुमत दिले होते. आता युगेंद्र पवार विजयी होतील. बारामती मतदारांची मला जितकी माहिती आहे, तितकी इतर क्वचितच कोणाला असेल. मला महाराष्ट्रातील राजकारणात शक्ती देण्याचे काम बारामतीने दिले. आता या निवडणुकीत बारामतीकर युगेंद्र पवार याला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असे शरद पवार यांनी म्हटले.