पुणे: मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील सह अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी सध्याच्या राजकारण्यांच्या कान टोचले. सध्या एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय आणि दिलगिरी व्यक्त करण्याची दुर्दैवी वेळ येते, अशा शब्दात शरद पवारांनी राजकीय नेत्यांना कान पिचक्या दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्दैवाने आज संघर्ष दिसत आहे. एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय. मग वक्तव्य मागे घ्यावे लागतायेत त्यांच्यावर दिलगिरी ही व्यक्त करण्याची वेळ येते. महाराष्ट्रातील ही आजची परिस्थिती आहे.किसनराव बाणखेले विरोधात असताना देखील जे वागायचे, त्याची कमतरता दिसते, असं शरद पवार म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत आणि शरद पवार यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीच सरकार आलं. मुख्यमंत्री स्वतः व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहणार होते. पण त्यांना बैठक लागली. त्यांनी खासदार राऊतांकडे निरोप दिलेला आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी काल राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहिते पाटलांवर शेलक्या शब्दात समाचार घेतला होता. संजय राऊत यांनी भाषण सुरू केले असता प्रमुख मान्यवरांची नावे घेत असताना खेड विधानसभा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा नाव घेताच उपस्थिता मध्ये एकच हशा पिकाला होता.
जुन्नर नंतर आंबेगावातील मंचर मधील कार्यक्रमात कोरोना नियमांना तिलांजली दिली गेली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. विशेष बाब म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघात हा कार्यक्रम सुरू होता.
माझ्याकडे 10 वर्ष कृषी खात होत. माझं लक्ष असल्यानं एक गोष्ट कटाक्षाने पाळली. शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत दिली तर हाच शेतकरी आर्थिक कणा सुधारवेल. माझ्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खाली येऊ दिले नाही. पण सध्या शेतकरी मेटाकुटीला आलाय. टोमॅटो, शिमला मिर्ची फेकून द्यावे लागले आणि साखरेचे भाव वाढत आहेत, अशीच परिस्थिती राहिली. तर उसाला दर जादा देता येईल, यासाठी लक्ष देण्याची गरज आहे, असा टोला शरद पवार यांनी केंद्र सरकारला लगावला.
इतर बातम्या:
Sharad Pawar slams politicians of Maharashtra who not follow limit in debate