राष्ट्रवादी कोणाची? सुनावणीस शरद पवार, सुप्रिया सुळे जाणार

| Updated on: Nov 19, 2023 | 2:10 PM

EC hearing on NCP Symbol | राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? यासंदर्भात महत्त्वाची सुनावणी सोमवारी नवी दिल्लीत होणार आहे. यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केले होते. अजित पवार गटाकडून युक्तीवादाला उत्तर दिले होते. आता पुन्हा सोमवारी सुनावणी होत आहे.

राष्ट्रवादी कोणाची? सुनावणीस शरद पवार, सुप्रिया सुळे जाणार
Sharad Pawar and Ajit Pawar
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे, दि. 19 नोव्हेंबर | केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? राष्ट्रवादी हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह कोणाचे? यावर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीस २० नोव्हेंबरपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. यापूर्वी दोन नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली होती. अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार गटाची बाजू खोडण्यात आली. आता पुन्हा सोमवारपासून सुनावणी सुरु होणार आहे. त्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीला जाणार आहेत. तसेच दिल्लीत शरद पवार गटाची बैठक होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी काय झाले

निवडणूक आयोगापुढे २ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यात अभिषेक मनु सिंघवी यांनी दोन तास युक्तिवाद केला. त्यात त्यांनी अजित पवार गटावर अनेक गंभीर आरोप केले. अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असल्याचा आरोप त्यांनी युक्तीवाद करताना केला. मृत्यू झालेल्या लोकांची प्रतिज्ञापत्रे दिली गेली आहे. तसेच अल्पवयीन मुलांची प्रतिज्ञापत्रे दाखल केल्याचा दावा सिंघवी यांनी केला. अजित पवार यांच्याकडे काहीच समर्थन नसल्याचे त्यांनी युक्तीवाद करताना म्हटले.

अजित पवार गटाने केली ही मागणी

दरम्यान, अजित पवार गटाकडून सलग सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे २० नोव्हेंबरपासून सलग सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे. सुनावणीत काही तांत्रिक गोष्टी आम्ही आयोगासमोर आणणार आहोत, असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे उद्याच्या नवी दिल्लीत होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शरद पवार दिल्लीला जाणार

निवडणूक आयोगात सुनावणी असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: दिल्लीला जात आहे. शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही नेते सकाळी दिल्लीला जाणार आहे. तसेच सुनावणीच्या आधी दिल्लीत शरद पवार गटाची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत रणनिती ठरवण्यात येण्याची शक्यता आहे.