सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतील वाद मिटणार की वाढणार हे नितीन चौगुलेंनी (Nitin Chougule) भूमिका मांडल्यानंतर स्पष्ट होणार आहे. शिवप्रतिष्ठान मधून निलंबित केलेले नितीन चौगुले आणि त्यांच्या समर्थक धारकाऱ्यांचा मेळावा सांगलीत पार पडत आहे. यामुळे आता या मेळाव्यातून चौगुले आणि समर्थक काय भूमिका घेणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Shiv Pratisthan internal issue raised Nitin Chougule supporters meeting held today in Sangli)
संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेते गेल्या 20 वर्षांपासून हिंदुत्ववादी व भिडे गुरुजींची कट्टर समर्थक म्हणून नितीन चौगुले यांना ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपासून नितीन चौगुले हे शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक म्हणून काम करत होते. शिवप्रतिष्ठान मध्ये भिडे गुरुजी यांच्या शब्दाबरोबर नितीन चौगुले यांच्या शब्दालाही तितकाचा मान होता.मात्र, 5 फेब्रुवारी रोजी शिवप्रतिष्ठानकडून राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून नितीन चौगुले यांना निलंबत करत काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अचानक नितीन चौगुलेंवर झालेल्या कारवाईमुळे शिवप्रतिष्ठानच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली होती. तर, निलंबनाचे कारण यासाठी नितीन चौगुले आणि समर्थक धारकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरात ठिय्या मारला होता. त्यावेळी चौगुले समर्थकांनी वेगळा विचार करण्याचा इशारा दिला होता.मात्र, निलंबनाचे कारण अद्याप देण्यात आले नाही. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नितीन चौगुले आणि समर्थक धारकऱ्यांनी अन्यायी कारवाई असल्याचा आरोप करत राज्यातील धारकाऱ्यांना चलो सांगलीची हाक दिली होती.
सांगलीच्या डेक्कन हॉल याठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नितीन चौगुले समर्थक हे झालेल्या कारवाई बाबत चर्चा करणार आहेत. शिवाय नितीन चौगुले हे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत खुलासा करत आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे नितीन चौगुले समर्थकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 4 वाजता या मेळाव्याला सुरवात होणार असून या मेळाव्याकडे लक्ष लागून राहिले असून शिवप्रतिष्ठान मधील फूट अटळ असल्याचे बोलले जात आहे.
संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट, कार्यवाहक नितीन चौगुले यांच्या निलंबनानंतर अंतर्गत कलह समोरhttps://t.co/3eBfw94nlu#SambhajiBhide #shivpratishthan #NitinChougule #Sangli
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 7, 2021
संबंधित बातम्या:
आम्हाला तक्रार करायची नाही, आम्हाला जगू द्या; पूजा चव्हाणच्या वडिलांची विनंती
(Shiv Pratisthan internal issue raised Nitin Chougule supporters meeting held today in Sangli)