पुणे : राज्यात शिवजयंती साजरी (Chhatrapati Shivaji Maharaj)करण्याची तयारी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. अनेक शिवभक्त शिवनेरीवर (Shivneri Fort) जाऊन शिवजयंती उत्साहात सहभागी होणार आहे. राज्याच्या पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 18 ते 20 फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिवभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी या निर्णयाची माहिती दिली.
१९ फेब्रुवारी रोजी देशभरात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त देशभरातील अनेक ठिकाणी व शिवनेरी किल्ल्यावर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवनेरी किल्ल्यावर येत्या रविवारी (१९ फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने शिवनेरीवर दाखल होण्याची शक्यता आहे. आता शिंदे सरकारने शिवप्रेमींना शिंदे सरकारने गिफ्ट दिले असून त्यादिवशी शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर टोलमाफी दिली आहे.
कुठे आहे टोलमाफी
खालापूर, खेड, राजगुरु नगर येथील टोल नाक्यांवरुन टोलमाफी करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने हा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोलताना भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, या तिन्ही टोलनाक्यावर टोलमाफी देण्याची मागणी अनेक शिवप्रेमींनी केली. त्यानंतर पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यांशी चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी चर्चा केली.तत्काळ त्यांना शिवभक्तांना १९ फेब्रुवारीला टोलमाफी देण्याची घोषणा केली.
तीन दिवस कार्यक्रम
शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर ३ दिवस महोत्सव चालणार आहे. या महोत्सावात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी कधीही ३ दिवस महोत्सव साजरा केला नव्हता, असे पर्यंटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. शिवनेरी किल्ल्यावर महाआरती करणार आहोत. जाणता राजाचा प्रयोग पाहता येणारआहे.
आम्ही किल्ल्यावर भगवा झेंडा कायमस्वरूपी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, तसेत फक्त शिवनेरी किल्ल्यावर ९० कोटी रुपये खर्च केले आहेत, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. शिवनेरी गडावर शिवप्रेमी मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता आहे. आता शिंदे सरकारने शिवप्रेमींना शिंदे सरकारने गिफ्ट दिले असून त्यादिवशी शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर टोलमाफी दिली आहे, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.