Shivajirao Adhalarao Patil : पवारांना पंतप्रधान करण्यासाठी 2009लाच फायनल झाली होती महाविकास आघाडी, शिवाजीराव आढळरावांचा गौप्यस्फोट

| Updated on: Jul 19, 2022 | 3:36 PM

महविकास आघाडीची ही युती 2009लाच होणार होती. मला तसे सांगण्यात आले, की राष्ट्रवादी आणि शिवसेना युती फायनल झालेली आहे. यासाठी उद्धव ठाकरेंची सभा रद्द केली जाणार होती, असे शिवाजीराव आढळराव म्हणाले आहेत.

Shivajirao Adhalarao Patil : पवारांना पंतप्रधान करण्यासाठी 2009लाच फायनल झाली होती महाविकास आघाडी, शिवाजीराव आढळरावांचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादीवर टीका करताना शिवाजीराव आढळराव पाटील
Image Credit source: tv9
Follow us on

आंबेगाव, पुणे : आत्ताची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) 2009ला होणार होती. फक्त शिरूर लोकसभेमुळे ती अडली होती. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली होती. शरद पवार (Sharad Pawar) यांना पंतप्रधान करण्यासाठी युती केली जाणार होती, असे वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी केले आहे. ते आंबेगावातील लांडेवाडीत बोलत होते. शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर व्यथीत असल्याचेही ते म्हणाले. तसेच तेव्हापासून मी निर्णय घेणार असल्याचे ठरले, असेही त्यांनी सांगितले. तर शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी 2009साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी तसेच अमोल कोल्हे यांच्यावरही टीका केली. ज्या पक्षाबरोबर इतकी वर्षे लढाई केली, त्यांच्यासोबत राहणे योग्य वाटत नसल्याचेही ते म्हणाले.

‘मला राज्यसभा खासदारकीची ऑफर’

महविकास आघाडीची ही युती 2009लाच होणार होती. मला तसे सांगण्यात आले, की राष्ट्रवादी आणि शिवसेना युती फायनल झालेली आहे. यासाठी उद्धव ठाकरेंची सभा रद्द केली जाणार होती. काय तर शरद पवार शिरूरमधून आणि मला मावळमधून लढवायचे होते. मात्र मला गृहीत धरू नका, असे म्हणून बाहेर पडलो. मग ही युती करायचे रद्द झाले. शरद पवार 2009साली बोलले होते. शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढणार होते. तर मला राज्यसभा खासदार करणार, असे म्हणाले होते. मात्र आपण त्यास नकार दिला.

‘जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न’

बैठकीत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झाला संजय राऊतानी सांगितल की तुम्ही पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवा. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पुणे लोकसभा द्या. दरम्यान, 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना युतीची कल्पना आढळराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दिल्यानंतर ही युती तुटली. तर आजही आम्ही मनाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. पण बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, जर काँग्रेस सोबत गेलो, तर माझे दुकान बंद करू, हे सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते, असे आढळराव म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले शिवाजीराव आढळराव पाटील?

सोशल मीडियावर कमेंट्स

खेड पंचायत समितीमध्ये 8 सदस्य शिवसेनेचे तरी राष्ट्रवादीने आपले सदस्य फोडत त्यांना आमदाराचे बंधू यांच्या हॉटेलवर ठेवले. मला काहींचे फोन सुद्धा आले. तिथे मारामारी झाली. त्यात सभापती भगवान पोखरकर यांच्यावर 307चे गुन्हे दाखल केले, असे आढळराव म्हणाले. माझी हकालपट्टी जेव्हा झाली, त्या दिवसापासून सोशल मीडियावर शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडा, अशा कमेंट्स आहेत, असेही आढळराव म्हणाले.