पुणे-नाशिक प्रवास होणार आरामदायक, ही नवीन सेवा झाली सुरु

| Updated on: Jul 10, 2023 | 9:25 AM

Nashik and Pune : नाशिक-पुणे प्रवास अधिक आरामदायक होणार आहे. या मार्गावर नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबई-पुणे प्रवासासारखी ही सुविधा मिळणार आहे. यामुळे पुणे अन् नाशिककरांना चांगलाच फायदा होणार आहे.

पुणे-नाशिक प्रवास होणार आरामदायक, ही नवीन सेवा झाली सुरु
pune nashik
Follow us on

पुणे : नाशिकवरुन थेट पुणे प्रवास सध्या रेल्वेने नाही. या मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन सुरु करण्याची घोषणा झाली आहे. परंतु या प्रकल्पास अजून बराच कालवधी लागणार आहे. सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी जमिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे पुणे-नाशिक प्रवास करण्यासाठी सध्या तरी रस्ते वाहतूक हाच एकमेव मार्ग आहे. परंतु रस्ते वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांच्यासाठी नवीन सुविधा सुरु झाली आहे. या सुविधांमुळे हा प्रवास आरामदायक होणार आहे.

काय सुरु झाली सुविधा

पुणे मुंबई मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने नवीन सुविधा सुरु केली आहे. राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बसेस सुरु होती. परंतु या मार्गावर पुणे-मुंबईला मिळणारी शिवनेरीसारखी सुविधा सुरु झाली आहे. पुणे-मुंबई महामार्गावर इलेक्ट्रीक शिवनेरी बसेस सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आधीच्या शिवनेरी बसेस पुणे नाशिक महामार्गासाठी सुरु करण्यात आल्या आहेत. त्याला जन शिवनेरी हे नाव दिले आहे. यामुळे हा प्रवास आरामदायी होणार आहे.

सकाळी ५ पासून सेवेला सुरुवात

जन शिवनेरी सेवेला सकाळी ५ वाजेपासून सुरुवात होणार आहे. दर तासाला ही बस सुटणार आहे. पुणे नाशिक प्रवास करणाऱ्या अनेक जणांना या सुविधेचा लाभ होणार आहे. या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे, त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

किती असणार तिकीट दर

जन शिवनेरी बसेसचा तिकीट दर शिवशाहीपेक्षा थोडा अधिक आहे. जन शिवनेरी बसेस ५०० रुपये आहे तर शिवशाही बसेचा तिकीट दर ४७५ रुपये आहे. ही बस सेवा कमी दरात सुरु करण्यात आली आहे. अन्यथा शिवनेरीचा दर या मार्गासाठी ७०० रुपये होऊ शकतो. शिवनेरी बसेस सुरु झाल्यामुळे शिवशाही बसेसची सेवा बंद करण्यात आली आहे.

तोपर्यंत हाच पर्याय

पुणे-नाशिक दरम्यान सरळ रेल्वेची सुविधा नाही. कोणाला रेल्वे जायाचे असेल तर पुणे येथून कल्याण अन् कल्याणवरुन पुन्हा दुसऱ्या ट्रेनने नाशिक गाठावे लागते. यात सुमारे पाच ते सहा तास जातात. परंतु आता जन शिवनेरी सुरु झाल्यामुळे प्रवास आरामदायक होणार आहे.

हे ही वाचा

पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातून जाणार सेमी हायस्पीड ट्रेन? पाहा कसा असणार मार्ग