पुणे : शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सरकारच्या एका मोठ्या निर्णयाची माहिती दिलीय. रविवारी साजरा होणारा शिवराज्याभिषेक दिन राज्यभरातील सर्व महाविद्यालयांमद्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. तर पुढील वर्षीपासून शिवज्योत रॅली काढली जाणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केलीय. त्याचा शुभारंभ उद्या पुण्यातील COEP महाविद्यालयात केला जाणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं. राज्यभरातील महाविद्यालये आणि खासगी वीद्यापीठातही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याबाबतचा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारने काढला आहे. त्याची एक प्रत खासदार संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलीय. (‘Shivrajyabhishek Din’ will be celebrated in every college as ‘Shivswarajya Din’)
उदय सामंत यांनी पुण्यासाठी अजून एक घोषणा केलीय. चिखली इथं COEP महाविद्यालयाचा नवा कॅम्पस तयार केला जाणार आहे. त्यासाठी आज 25 कोटी रुपये दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर 12 वी पास झालेला एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. त्याला त्याच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश दिले जाणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं. त्यातबरोबर शैक्षणिक वर्ष 22 आणि 23 मध्ये प्राध्यापक भरती झालेली असले. नवीन प्राध्यापकही कामावर रुजू झालेले असतील. त्याचबरोबर मागील वर्षीपेक्षा यंदा CET साठी दुप्पट केंद्र असतील असंही सामंत यांनी जाहीर केलंय. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं शुल्क कमी करण्यासंदर्भात येत्या 2 ते 3 दिवसांत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही सामंत म्हणालेत.
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे आज भेट देऊन संस्थेच्या विकासात्मक कामांचा आणि चिखली येथील विस्तारित शैक्षणिक संकुलाचा आढावा घेतला. यावेळी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, महाविद्यालयाचे संचालक बी.बी.अहुजा व संबंधित उपस्थित होते. pic.twitter.com/vBbeVroQDV
— Uday Samant (@samant_uday) June 5, 2021
विनायक मेटे यांनी आज बीडमध्ये काढलेल्या मराठा मोर्चाबाबतही उदय सामंत यांनी भाष्य केलं. विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी. त्यांच्याशी बोलून निर्णय घ्यावा. त्यांनी कोरोना काळात मोर्चा काढायला नको होता, असं सामंत यांनी म्हटलंय. तसंच सरकारमध्ये समन्वय आहे. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेनंतर स्पष्टीकरण दिलं आहे, असंही सामंत म्हणाले.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी उदय सामंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी सरकारच्या शिवराज्याभिषेक दिनाबाबतच्या अध्यादेशाची प्रत संभाजीराजेंना देण्यात आली. राज्यातील सर्व महाविद्यालये आणि खासगी विद्यापीठांमध्येही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याबाबत ठाकरे सरकारकडून अध्यादेश काढण्यात आलाय. या दिवशी शिवकालीन विषयांवर महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमाबद्दल आभार मानतानाच संभाजीराजे यांनी या निर्णयाचं स्वागतही केलंय. हा दिवस खरंतर राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा. महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती आजच्या पिढीला मिळायला हवी. महाराजांच्या आजार आणि विचारांचा प्रसार व्हायला हवा. ही त्याचीच सुरुवात असल्याचं संभाजीराजे यावेळी म्हणाले.
शिवराज्याभिषेक दिवस राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये,अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये #शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय @YuvrajSambhaji यांच्याकडे सुपुर्द केला. pic.twitter.com/2OKtRngqyK
— Uday Samant (@samant_uday) June 3, 2021
संबंधित बातम्या :
‘Shivrajyabhishek Din’ will be celebrated in every college as ‘Shivswarajya Din’