पुणे : शिवसेना नेते संजय राऊत रविवारी (26 सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्याच्या वडगाव शेरीत त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मोळावा पार पडला. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंवरही यावेळी सडकून टीका केली. भाषण करत असताना राऊत यांनी आपली व्यवस्था उत्तम चालत असल्यामुळे विरोधी पक्षाला त्रास सुरू झाला आहे, असे म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांमधून कोंबडी चोर अशी प्रतिक्रिया आली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, अटक झाली ना, जेवता ताटावर उठवला अजून कशावरून उठवायचा ते सांगा तिथूनही उठवतो. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका शिवसेना हि आग आहे, असा इशाराही राऊंतांनी राणेंना दिला. (Shivsena leader sanjay raut reaction on narayan rane in pune sabha)
संजय राऊत यांनी भाषणावेळी चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. “बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच शासकीय पद स्विकारलं नाही. त्यांना अनेक पदांची लालसा धरता आली असती. पण कोणत्याही पदावर बसलेले नसताना या देशाच्या सगळ्यात मोठा सत्ताधीश कोण असेल तर तो बाळासाहेब ठाकरे होता. त्यामुळे जे मंत्री, आमदार, खासदार होतात त्यांना सांगतो, हे काही नाही. पक्ष महत्त्वाचा, पक्षाचं संघटन महत्त्वाचं. मी कधीही केंद्रामध्ये संधी असताना मंत्री झालो नाही कारण मला ‘सामना’चं पद सोडावं लागेल. ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जिथे पक्षाचं काम आहे तिथे मी काम करतो. मंत्रिपदं येतात आणि जातात. मग माजी, मला माजी म्हणू नका. आम्हाला कधी कोणी माजी म्हणणार नाही”, असं म्हणज राऊतांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
“पुण्याच्या सर्व शिवसैनिकांना एकच सांगतो, आपण उद्धवजींकडे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहतो तेव्हा ते आपले पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख आहेत. जेव्हा ते या देशाचे पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले तेव्हा शिवसेना हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमाकांचा पक्ष बनावा, ही आपली सर्वांची भूमिका आहे. महिला, विद्यार्थी, तरुण समाजाती सर्व घटकांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे. शिवसेना जातपात न बघणारी संघटना आहे. बाळासाहेबांनी कधीही कुणाची जात वाचून पद किंवा उमेदवार दिला नाही. अनेक वर्ष आम्हाला कुणाची जात काय हे कळलं नव्हतं. कुणाची जात काय काय हे माहिती नव्हतं. तसेच आम्ही धर्मही विचारला नाही. हा महाराष्ट्र आणि देश एक आहे या भावनेने बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण केलं. तोच विचार आम्ही पुढे नेला”, असं राऊत म्हणाले. (Shivsena leader sanjay raut reaction on narayan rane in pune sabha)
संबंधित बातम्या
VIDEO : संजय राऊतांची भरसभेत घोडे लावण्याची भाषा, एक्सपर्ट असल्याचंही वक्तव्य, नेमकं काय घडलं?
शिवतारेंनी अजित पवारांना ललकारलं, राऊत म्हणाले, त्यांना भेटा, आम्ही तुमच्या पाठिशी!