तो 12 वर्षाचा, ती 7 वर्षाची, त्याने जे केले ते त्याची कुणी कल्पनाही केली नसेल

| Updated on: Jun 30, 2023 | 11:22 AM

Pune Cirme News : पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे समाजातील प्रत्येक जण अस्वस्थ झाला आहे. एका अल्पवयीन मुलाने हा प्रकार केला असल्यामुळे समाजातून चिंता व्यक्त केली जात आहे.

तो 12 वर्षाचा, ती 7 वर्षाची, त्याने जे केले ते त्याची कुणी कल्पनाही केली नसेल
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलांशी अश्लील वर्तन करणारा अटक
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे चिंता निर्माण झाली आहे. जे वय खेळण्याचे असते, टीनएजर्स अजून मुलगा झालेला नाही, त्या वयात त्याने जो प्रकार केला, त्यानंतर पालकांच्या पायाखालची वाळूच घसरली. मोबाइल अन् टीव्हीने मुलांना काय दिले? हे यामुळे पुढे आले आहे. आपण पाश्चत्य जगाकडे वाटचाल तर करत नाही ना? अशी भीती निर्माण झाली आहे. खरंतर अशा प्रकारांना पूर्णपणे आळा बसवण्यासाठी पालकांनी घरातूनच संस्कार निर्माण केले पाहिजे. ही जबाबदारी फक्त शाळांवर सोपवून पालकांचे काम होणार नाही, तर मुलांना घरातूनच धडे दिले पाहिजे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले

पुणे जिल्ह्यात एका बारा वर्षीय मुलाने चक्क सात वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणाची माहिती मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. त्या १२ वर्षीय मुलाने शाळेच्या बाथरुममध्ये सात वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर त्या मुलीने ही घटना घरी आपल्या पालकांना सांगितली अन् त्यांना हादराच बसला. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

हे सुद्धा वाचा

बालकल्याण समितीसमोर प्रकरण

पुणे जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी हे प्रकरण बालकल्याण समितीसमोर नेले. या घटनेबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी आणि तिच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी १२ वर्षीय मुलाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. तसेच मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षणासंदर्भात असलेल्या पोक्सो कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु झाली आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.