दुकाने सुरुच ठेवणार, काळ्या फिती बांधून लखीमपूर खेरी घटनेचा निषेध, पुण्यात व्यापाऱ्यांचा पवित्रा, बंद यशस्वी होणार ?

| Updated on: Oct 10, 2021 | 1:31 PM

बंददरम्यान आम्ही दुकाने सुरुच ठेवणार असा पवित्रा पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. दुकाने सुरु ठेवली तरी आम्ही शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधू असं वापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे.

दुकाने सुरुच ठेवणार, काळ्या फिती बांधून लखीमपूर खेरी घटनेचा निषेध, पुण्यात व्यापाऱ्यांचा पवित्रा, बंद यशस्वी होणार ?
MAHARASHTRA BANDH
Follow us on

पुणे : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्रात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या बंददरम्यान आम्ही दुकाने सुरुच ठेवणार असा पवित्रा पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. दुकाने सुरु ठेवली तरी आम्ही शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधू, असं वापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे.

पुण्यात दुकाने बंद न ठेवण्याची भूमिका 

उत्तरप्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या अंगावरून वाहने घालण्यात आली. यामध्ये चार शेतकरी तसेच अन्य चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनीदेखील या घटनेच्या निषेध म्हणून सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र, पुण्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद न ठेवण्याची भूमिका घेतलीय. सोमवारी दुकाने सुरुच ठेवली जातील. मात्र, शेतकऱ्यांच्या मृत्यूचा निषेध म्हणून आम्ही काळ्या फिती लावू, असं येथील व्यापाऱ्यांनी म्हटलंय.

 पुण्यातील बंद यशस्वी होणार का ?

कोरोना काळात व्यापार बंद राहिल्याने सध्या दुकाने बंद ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. काळ्या फिती बांधून व्यवसाय मात्र सुरुच ठेवणार आहोत, असं पुणे जिल्हा रिटेल संघानं सांगितलंय. संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी याविषयी अधिक माहिती दिलीय. त्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांच्या या भूमिकेमुळे सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला कितपत यश मिळणार ? असा प्रश्न विचारला जातोय.

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा बंदला पाठिंबा

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल (9 ऑक्टोबर) तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.

इतर बातम्या :

Video | ITच्या धाडीनंतर पहिलाच बारामती दौरा, महिला म्हणतात “तुमचं काम एक नंबर,” अजितदादांच्या डोळ्यात अश्रू तरळले

औरंगाबाद-पैठण रोडच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा, मंत्री भुमरे यांची गडकरींशी चर्चा, डिसेंबरमध्ये भूसंपादन

लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या; ‘महाराष्ट्र बंद’पूर्वीच राष्ट्रवादी आक्रमक

(shop will be kept open in pune during monday maharashtra bandh organised by maha vikas aghadi)