अक्षय तृतीयेनंतर हापूस आंब्याचे दर काय? सध्या किती होतेय आवाक

| Updated on: Apr 26, 2023 | 3:12 PM

Alphonso mangoes : अक्षय तृतीयेनंतर हापूस आंब्याचे दर कमी होतात. परंतु यंदा परिस्थिती वेगळी आहे. अवकाळी पावसाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. यामुळे यंदा दर कमी झाले का? हा प्रश्न आहे. परंतु अजून दिलासा मिळालेला नाहीय.

अक्षय तृतीयेनंतर हापूस आंब्याचे दर काय? सध्या किती होतेय आवाक
hapus mango
Follow us on

पुणे : हापूस आंबा खरेदीसाठी मुंबई आणि पुणेकरांनी गर्दी केली आहे. परंतु यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे हापूस आंब्याचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी घटले असल्याचे उत्पादक सांगत आहेत. मार्केटमध्ये आंब्याची आवक घटल्याने मोठी भाव वाढ आहे. अक्षय तृतीयेनंतर हापूस आंब्याचे दर कमी होतात. परंतु यंदा अजूनही दर कमी झालेले नाही. यंदा भाव खाणारा हापूस आंबा गोड कधी होणार? याची प्रतिक्षा आंबाप्रेमी करत आहेत. परंतु सध्यातरी चढ्या भावानेच आंब्या घ्यावा लागणार आहे.

मुंबईत किती झाली आवाक

नवी मुंबईतील एपीएमसीतील फळ बाजारपेठेत राज्यातून 18,526 तर इतर राज्यातून 21,942 इतक्या हापूस आंब्याच्या पेटींची आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हापूस आंब्याची आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. एप्रिल महिन्यात अक्षय तृतीयेनंतर हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर येतो. मुख्य हंगाम असून देखील आवक कमी होत आहे. त्यामुळे हापूस आंब्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईतील एपीएमसीमध्ये हापूस आंब्याच्या प्रती पेटीचा दर दोनशे रुपयांनी वाढलेला आहे. सध्या हापूस आंब्याची एक पेटी 2200 ते 5200 रुपयांना मिळत आहे. आधीचे हापूस आंब्यांचे प्रतीपेटी दर हे 2000 ते 5000 हजारपर्यंत होते.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात काय आहेत दर

पुणे शहरात हापूस आंब्याचे दर चढेच आहेत. किरकोळ विक्रीचा दर 800 ते 1,200 रुपये डझन आहे. घाऊक बाजारात 4 ते 6 डझनचे बॉक्स 2,500 ते 3,000 रुपये दराने मिळत आहे. तसेच 5 ते 10 डझनचे बॉक्सचे दर 3,500 ते 6,000 रुपये आहे.

का वाढले दर

यंदा अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे दर वाढले आहे. अवकाळी पावसाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. यामुळे उत्पादन कमी झाले असून दर वाढलेले आहे. अक्षय तृतीयेनंतरही हापूसचे दर वधारून आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हापूसचा म्हणावा तसा आस्वाद आत्तापर्यंत तरी घेता आला नाही. ही कसर हापूसनंतर येणारा केसर (Kesar mango) भरून काढेल, अशी आशा होती. परंतु ती ही अजून पूर्ण झाली नाही.

कोकणातूनच सर्वाधिक आवक

यंदा हापूसच्या उत्पादनात घट झाली आहे. परंतु या त्या उत्पादनातून अधिकचा फायदा होण्याच्या दृष्टीने उत्पादकांनी गणिते मांडली होती. त्यामुळे दर वाढले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये कोकणातून सर्वाधिक आवक होत आहे.